औरंगाबाद - कोरोना काळातील सर्व निर्बंध मागे घेतल्याने सर्वसण आनंदाने आणि उत्साहात साजरे केले जात आहे. समाजील सलोखा झाला पाहिजे. मात्र काही लोक तस होऊ देत नाही. हनुमान चालीसा म्हणायची तर आपण आपल्या घरी वाचावी. मात्र एका विशिष्ठ ठिकाणीच जाऊन वाचू याला अर्थ आहे का, सवाल आणि टीका उपुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.
भोंगे आताच का आठवले? - मी आमदार आहे. माझी बहीण खासदार आहे. आम्हाला हनुमान चालीसा म्हणायची तर आम्ही आमच्या घरी किंवा मंदिरात वाचू, इकडेच का वाचायची. इतक्या दिवस भोंगा का आठवला नाही. आताच का आठवला. सर्वजण मिसळून रहा, हिच शिकवण आपल्याला दिली आहे. काही लोक राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तसं काही उपयोग होणार नाही, अशी टोलेबाजी अजित पवार यांनी केली.