औरंगाबाद - शहरातील जिन्सी पोलीस ठाण्याकडून एका वर्षासाठी तडीपार करण्यात आलेल्या आरोपीला गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी पाठलाग करून अटक केली. शेख बबलु शेख बना ऊर्फ चन्ना (वय 36, रा. इंदीरानगर बायजीपुरा ग. नं 34) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
औरंगाबादेत रेकॉर्डवरील तडीपार आरोपीला अटक, जिन्सी पोलिसांची कामगिरी
जिन्सी पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असताना एका वर्षाकरता तडीपार करण्यात आलेला अट्टल गुन्हेगार चन्ना संशयीतरित्या फिरताना आढळला. यावेळी, गुन्हे शोध पथकाने तत्काळ तो असलेल्या ठिकाणी पोहोचत चन्नाला ताब्यात घेतले.
औरंगाबाद जिल्ह्यात जनता कर्फ्युच्या माध्यमातून नऊ दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यान, जिन्सी पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असताना एका वर्षाकरता तडीपार करण्यात आलेला अट्टल गुन्हेगार चन्ना संशयीतरित्या फिरताना आढळला. यावेळी, गुन्हे शोध पथकाने तत्काळ तो असलेल्या ठिकाणी पोहोचत चन्नाला ताब्यात घेतले. हा आरोपी तडीपार असल्यामुळे त्याच्यावर जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कामगिरी पोलीस निरीक्षक व्ही. एम. केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक, दत्ता शेळके, रफी शेख, संपत राठोड, हारुण शेख, संजय गावंडे, गणेश नागरे, प्रवीण टेकले, संतोष वाघ यांनी केली आहे.