औरंगाबाद- कन्नड तालुक्यात वातावरणात दररोज होणाऱ्या बदलांमुळे साथीच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. कन्नड शहरामध्ये सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळत आहेत. प्रत्येक घरामध्ये दोन किंवा तीन रुग्ण आहेतच. त्याचबरोबर ग्रामीण भागात हे रुग्ण जास्त प्रमाणात आढळत आहेत. यावर उपचारासाठी रुग्णालयांमध्ये मात्र औषधांची कमतरता आहे.
कन्नड तालुक्यात साथीच्या आजारांची लाट हेही वाचा -देशात प्रथमच येणार कलाकार रोबो, मुंबई आयआयटीमध्ये सादर करणार कला
डॉ. रुचुता रणवीर थोरात यांनी सांगितले की, सांडपाण्यामुळे डेंग्यूचे प्रमाण वाढत आहे. जास्त प्रमाणात ग्रामीण भागात याचे जास्त प्रमाण आहे. त्यासाठी सांडपाण्याचा उपयोग कमी करणे, ताप आला की लगेच रक्त तपासणी करून त्यावर उपचार करणे, स्वछता ठेवणे, त्यामुळे या आजारांना आळा बसेल. जर ताप येऊन तो लगेच कमी होत नसल्यास लगेच रक्त तपासनी करून घेण्याचे आवाहन डॉ. रुचुता रणवीर थोरात यांनी केले आहे.
शहरातील वातावरणाच्या बदलामुळे सर्दी, खोकला, तापेच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज ग्रामीण रुग्णालयात 300 ते 400 रुग्णांची तपासणी केली जात आहे. रुग्णांमध्ये लहान मुलांचे प्रमाण जास्त आहे.
औषधासंदर्भात रुग्णालयातून माहिती घेतली असता, रुग्णालयात टॅबलेट असून खोकल्यासाठीचे औषधं मागली 20 दिवसांपासून उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली आहे. तसेच सध्या साथीच्या रोगांचे प्रमाण जास्त असल्यामुळे जिल्हा चिकित्सलयातूनही औषधं उपलब्ध होत नसल्याचे समजले. या सर्व परिस्थितीमुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. तपासणीसाठी येताना रुग्णांना औषधं बाहेरून विकत घ्यावे लागत आहे.