औरंगाबाद -कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. शहरातील सर्वच रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांना प्रतीक्षा यादीत राहण्याची वेळ आली आहे. त्यात ऑक्सिजनची मागणी वाढली असून त्या मानाने पुरवठा कमी पडत असल्याचे शहरात दिसून येत आहे.
कोरोनामुळे ऑक्सिजनच्या मागणीत वाढ, घरी सिलेंडर नेणाऱ्यांच्या संख्येतही भर
रुग्णालयात मागणी वाढत असताना घरात ऑक्सिजन सिलेंडर घेऊन उपचार घेणाऱ्यांची संख्या देखील पूर्वीपेक्षा 70 टक्क्यांनी वाढली आहे. जिथे एका एजन्सीमधून सात ते आठ जण उपचारासाठी सिलेंडर घेत असत, तिथे आता 50 ते 60 रुग्ण घरी सिलेंडर मागवत असल्याचे समोर आले आहे. अस्थमा, आणि श्वसनाचे त्रास होत असलेले घरी उपचार घेण्यास शक्य असणारे रुग्ण आधी ऑक्सिजन सिलेंडर मागवत होते. त्यामध्ये कोरोनाचे कमी लक्षणे असलेले मात्र घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची त्यात भर पडल्याचे दिसून आले आहे.
रुग्णालयात मागणी वाढत असताना घरात ऑक्सिजन सिलेंडर घेऊन उपचार घेणाऱ्यांची संख्या देखील पूर्वीपेक्षा 70 टक्क्यांनी वाढली आहे. जिथे एका एजन्सीमधून सात ते आठ जण उपचारासाठी सिलेंडर घेत असत, तिथे आता 50 ते 60 रुग्ण घरी सिलेंडर मागवत असल्याचे समोर आले आहे. अस्थमा, आणि श्वसनाचे त्रास होत असलेले घरी उपचार घेण्यास शक्य असणारे रुग्ण आधी ऑक्सिजन सिलेंडर मागवत होते. त्यामध्ये कोरोनाचे कमी लक्षणे असलेले मात्र घरी उपचार घेणाऱ्या त्यात रुग्णांची भर पडल्याचे दिसून आले आहे. या रुग्णांमुळे ऑक्सिजन सिलेंडरची मागणी देखील वाढली आहे. पुढील काही दिवसांमध्ये कोविड रुग्णालयात ऑक्सिजन बेड वाढवण्याची तयारी मनपा करत आहे. मात्र बेड जरी वाढवले तरी ऑक्सिजन आणणार कुठून हा प्रश्न निर्माण होतो आहे.