औरंगाबाद- मराठवाड्यात यावर्षी अतिवृष्टी झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षातर्फे औरंगाबादच्या विभागीय अधिकारी कार्यालयासमोर निर्दशने करण्यात आली. लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या, यासह विविध मागण्या शेकाप तर्फे करण्यात आल्या.
यावर्षी मराठवाड्यासह राज्यात सर्वदूर चांगला पाऊल झाला. मूग काढणीला पावसाने कहर केल्याने उडीद पीक पाण्याखाली आले आहे. त्याला कोंब फुटल्याने नुकसान होणार आहे. अशीच अवस्था सोयाबीनची आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांची अवस्था वाईट असल्याने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर करावी. तसेच, देशात लागू केलेला कृषी कायदा राज्यात लागू करू नये, अशी मागणी आंदोलनात करण्यात आली.
शेकाप तर्फे करण्यात आलेल्या मागण्या..
१) मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करा.
२) कापसाला किमान आठ हजारांचा भाव द्या.