महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pre Monsoon Rain in Maharashtra : छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सून पूर्व पावसाची दाणादाण; तरुणासह जनावरांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सून पूर्व पावसाने रविवारी दाणादाण उडवली. या पावसामध्ये एका व्यक्तीसह जनावरांचा मृत्यू देखील झाला आहे.

By

Published : Jun 5, 2023, 11:51 AM IST

Pre Monsoon Rains
छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सून पूर्व पाऊस

छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सून पूर्व पाऊस

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : रविवारी अचानक वातावरणात बदल घडला. वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यात वीज पडून एका जणाचा मृत्यू झाला तर एक लहान मुलगा जखमी झाला. गंगापूर तालुक्यात तुर्काबाद खराडी येथे 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. तर काही फर्दापूर येथे वीज पडल्याने जनावरांचा गोठा जळून खाक झाला, तर कन्नड तालुक्यात चार शेळ्यांचा मृत्यू झाला. वेगवेगळ्या घटनेत सात जण जखमी झाले. पाचोड येथे वादळी वाऱ्यात पत्र्याची दुकान कागदासारखी उडत गेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.


वीज पडल्याने एकाचा मृत्यू :रविवारी दुपारनंतर अचानक सुसाट वारे वाहू लागले. विजेच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गंगापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट झालेल्या पावसात तुर्काबाद खराडी येथे कृष्णा रामदास मेटे (वय 23) व निलेश संतोष मेटे (वय14) हे रस्त्यावरील शेतात काम करत होते. त्यात वादळी वारा सुरू झाल्याने त्यांनी लिंबाच्या झाडाखाली आडोशाला थांबले. त्यावेळी वीज पडली आणि या दुर्घटनेत कृष्णा रामदास मेटे हा गंभीर जखमी झाला तर निलेश मेटे हा होरपळला. त्या दोघांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी कृष्णा मेटे याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

जनावरे दगावली :जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी विज पडून जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या. फर्दापूर येथे जनावरांच्या गोठ्यावर वीज पडून गोठ्याला आग लागली. त्यात एका बैलाचा मृत्यू झाला तर, तीन म्हशी, एक गाय आणि एक बैल यात जखमी झाला. लासुर स्टेशन भागात वीज पडून दोन बैल आणि एक गाय दगावली. कन्नड येथील चापानेरजवळ वादळी वाऱ्यामुळे विजेचे तार घर्षण होऊन ठिणगी गोठ्यावर पडली आणि गोठ्याला लाग लागली. या घटनेत चार शेळ्या, शेती अवजारे जळून खाक झाले. तर वेगवेगळ्या घटनेत जवळपास सात नागरिक जखमी झाले आहेत.


वादळी वाऱ्याने उडवली दाणादाण :रविवारी दुपारनंतर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वादळी वाऱ्याने दमदार हजेरी लावली. ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले. निसर्गात झालेल्या या बदलामुळे अनेक ठिकाणी मालमत्तेचे नुकसान झाले. झाडे कोसळली पत्र्याचे शेड असलेले दुकान कोल मोडली. मराठवाड्यात सर्वत्र असे चित्र पाहायला मिळाले. विभागात जवळपास 369 झाडे कोसळली. यामधे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 286 तर जालना जिल्ह्यात 80 झाडे पडली. तर अन्य ठिकाणी देखील अशीच परिस्थिती असल्याने मोठे नुकसान झाल्याचे या निमित्ताने समोर आले.

हेही वाचा :

  1. Rain In Thane : भिवंडी ग्रामीण भागात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचे तांडव; घरांसह झाडांची पडझड
  2. Monsoon Update : पावसाची बातमी! भारतात या दिवशी दाखल होणार मान्सून, यंदा पाऊस..
  3. Weather Update: राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कुठे पडणार पाऊस?

ABOUT THE AUTHOR

...view details