औरंगाबाद -पैठण तालुक्यातील थेरगाव येथे तरुणीचा पाणी काढताना पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पूजा रामभाऊ सोरमारे (18) असे या तरुणीचे नाव आहे.
पाय घसरून पडली विहिरीत

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पूजा आपल्या कुटुंबासोबत थेरगाव शिवारातील शेतवस्तीवर राहाते. घरी पाणी नसल्याने ती शेजारीच असलेल्या शेतातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली होती. मात्र लाईट नसल्याने मोटर चालू नव्हती. ती बकेटच्या साह्याने पाणी काढत होती. याचदरम्यान तिचा पाय घसरून ती विहिरीत पडली. दीड तास झाला तरी पूजा पाणी घेऊन परत आली नसल्याने, तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला असता, ती विहिरीत मृतावस्थेत आढळून आली. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा -वैजापूर : उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गर्दी झाल्याने दुकानदाराला 25 हजाराचा दंड