औरंगाबाद- घरात नळाचे पाणी भरण्यासाठी मोटार लावताना वीज प्रवाह उतरल्याने 24 वर्षीय विवाहितेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री रांजणगाव येखे घडली. शेख शबाना शेख इरफान (वय 24) असे मृत महिलेचे नाव आहे.
पाणी भरताना मोटारीचा शॉक लागून महिलेचा मृत्यू - shock
घरात नळाचे पाणी भरण्यासाठी मोटार लावताना वीज प्रवाह उतरल्याने 24 वर्षीय विवाहितेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. रांजणगावमधील देवगिरी कॉलोनी येथील हा प्रकार आहे.
गुरुवारी संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास नळाला पाणी आल्याने शबाना या पाणी भरण्यासाठी पाण्याची मोटार लावीत होत्या. यावेळी अचानक त्यांच्या हाताचा स्पर्श मोटारीच्या पिनला लागल्याने त्यांना विजेचा जोराचा झटका बसला व त्या खाली कोसळल्या. ही बाब शेजारी पाणी भरणाऱ्या महिलांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्यांच्या घरच्यांना महिती दिली.शबाना यांना तातडीने घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन शबाना यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवलदार के बी देवरे करीत आहेत.