महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादेत मायलेकीचा खून? रुग्णवाहिका नसल्याने मृतदेह खांद्यावरून नेण्याची नामुष्की... - aurangabad crime

सोमवारी डोंगरगाव शिवारात विहिरीत मायलेकींचा मृतदेह आढळला होता. या दोघी तीन दिवसांपासून गायब होत्या. मृतदेह बाहेर काढल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने दोन्ही मृतदेह खाटेवर टाकून अडीच किलोमीटर उचलून नेण्याची वेळ नातेवाईकांवर आली. औरंगाबादेतील सिल्लोड तालुक्यात ही घटना घडली.

aurangabad crime
रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने दोन मृतदेह खाटेवर टाकून अडीच किलोमीटर उचलून नेल्याची घटना घडली.

By

Published : Feb 18, 2020, 4:10 PM IST

औरंगाबाद - रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने दोन मृतदेह खाटेवर टाकून अडीच किलोमीटर उचलून नेल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात घडली. हे मृतदेह तीन दिवसांपासून गायब असलेल्या मायलेकींचे असून ते डोंगरगाव शिवारातील विहिरीत आढळून आले. मात्र, मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यासाठीची यंत्रणा आणि ते शवविच्छेदनासाठी नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सोमवारी सिल्लोडच्या डोंगरगाव शिवारात विहिरीत मायलेकींचे मृतदेह आढळले होते. मागील तीन दिवस या मायलेकी गायब होत्या. सोमवारी विहिरीत त्यांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. मृतांवर अत्याचार करून त्यांचा खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतरही विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी यंत्रणा उपलब्नध झाली नाही. अखेर गावकऱ्यांनीच हे मृतदेह बाहेर काढले. यावर कहर म्हणजे, मृतदेह नेण्यासाठी पोलिसांची गाडी अथवा रुग्णवाहिका देखील उपलब्ध नव्हती. यामुळे गावकऱ्यांनीच बाजेवर टाकून हे मृतदेह जिल्ह्याच्या ठिकाणी नेले. तब्बल अडीच किलोमीटर मृतदेह खांद्यावर उचलून नातेवाईकांना चालावे लागले.

रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने दोन मृतदेह खाटेवर टाकून अडीच किलोमीटर उचलून नेल्याची घटना घडली.

यानंतर एका काळीपिवळी जीपमध्ये मृतदेह सिल्लोडला आणण्यात आले. या ठिकाणीही शिवविच्छेदन शक्य नसल्याने त्याच जीपमधून मृतदेह औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात आणावे लागले. नातवाईकांनी या संबंधित घटनेचा एक व्हिडियो मोबाईलवर काढला आहे.

मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. तसेच, कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिकाही नातेवाईकांनी घेतली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details