औरंगाबाद -गेल्या काही दिवसांपासून बर्ड फ्ल्यू आजाराची साथ राज्यात पसरली आहे. या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात येत आहे. दरम्यान औरंगाबाद शहरातील हिमायत बागमध्ये पक्षीप्रेमी चंद्रशेखर बोर्डे यांना बुधवारी सकाळच्या सुमारास खंड्या पक्षी मृतावस्थेत आढळून आला. दरम्यान त्यांनी तात्काळ त्या पक्ष्याला पशुवैद्यकीय विभागात नेले. या मृत पक्ष्याला पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वल्लभ जोशी यांनी ताब्यात घेतले असून, तपासणीसाठी त्याचे नमुने पुण्याला पाठवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
औरंगाबाद: हिमायत बागेत आढळला मृतावस्थेत खंड्या पक्षी - Bird flu latest news Aurangabad
गेल्या काही दिवसांपासून बर्ड फ्ल्यू आजाराची साथ राज्यात पसरली आहे. या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात येत आहे. दरम्यान औरंगाबाद शहरातील हिमायत बागमध्ये पक्षीप्रेमी चंद्रशेखर बोर्डे यांना बुधवारी सकाळच्या सुमारास खंड्या पक्षी मृतावस्थेत आढळून आला. दरम्यान त्यांनी तात्काळ या पक्ष्याला पशुवैद्यकीय विभागाच्या ताब्यात दिले आहे.
![औरंगाबाद: हिमायत बागेत आढळला मृतावस्थेत खंड्या पक्षी हिमायत बागेत आढळला मृतावस्थेत खंड्या पक्षी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10228408-360-10228408-1610537299214.jpg)
मृत पक्ष्याचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवणार
सकाळच्या सुमारास चंद्रशेखर बोर्डे हे आपल्या घरातील लाहान मुलांना घेऊन फिरण्यासाठी हिमायत बागेमध्ये आले होते. यावेळी त्यांना याठिकाणी एक मृत पक्षी आढळून आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता तो खंड्या पक्षी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेऊन, नितीन पोटला यांच्या मदतीने या पक्ष्याला पशुवैद्यकीय विभागाच्या ताब्यात दिले. दरम्यान या पक्ष्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे आताच सांगता येणार नाही, मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी या पक्ष्याचे नमुने पुण्यातला पाठवण्यात येणार आहेत. हा अहवाल येण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागेल, त्यानंतरच या पक्ष्याचा नेमका कशामुळे मृत्यू झाला हे स्पष्ट होणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.