महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये तलवारीने केक कापून फोटो सोशल मीडियावर टाकणे पडले महागात

मुकुंदवाडी परिसरात राहणाऱ्या नितेश चव्हाण याने वाढदिवस साजरा करताना तलवारीने केक कापला. केक कापतानांचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत, अशी खात्रीलायक माहिती पोलीसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नितेश उर्फ मॉन्टी पंढरीनाथ चव्हाण (वय, २७ रा. मुकूंदनगर, मुकुंदवाडी) याला ताब्यात घेवून घरातुन एक लोखंडी तलवार व 28000/- रुपये किंमतीच मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

तलवारी  केक
तलवारी केक

By

Published : May 19, 2021, 12:07 AM IST

औरंगाबाद - मुकुंदवाडी परिसरामध्ये वाढदिवसाचा केक तलवारीने कापून परिसरामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पथकाने तलवारीसह अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून २९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारने दिलेल्या माहितीनुसार मुकुंदवाडी परिसरात राहणाऱ्या नितेश चव्हाण याने वाढदिवस साजरा करताना तलवारीने केक कापला. केक कापतानांचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत, अशी खात्रीलायक माहिती पोलीसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नितेश उर्फ मॉन्टी पंढरीनाथ चव्हाण (वय, २७ रा. मुकूंदनगर, मुकुंदवाडी) याला ताब्यात घेवून घरातुन एक लोखंडी तलवार व 28000/- रुपये किंमतीच मोबाईल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान बेकायदेशिर रित्या तलवार बाळगतांना नितेश चव्हाण, राजु म्हस्के या दोघांविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details