महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rain Update : अवकाळी पावसाने पिके भुईसपाट, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला - अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान

अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याने शेतात हाताशी आलेले गहू, मका पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. गंगापूर तालुक्यात होळीच्या दिवशी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने शेतकऱ्याच्या सुखाची होळी केली आहे. अवकाळी पावसाने शेतात पाणी साचले आहे. नुकसान झालेल्या पिकाची तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकरी करत आहे.

Rains in Chhatrapati Sambhaji Nagar
पिकांची राखरांगोळी

By

Published : Mar 7, 2023, 3:34 PM IST

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीविषयी सांगताना शेतकरी

गंगापूर(छत्रपती संभाजी नगर):आधीच अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरिपाची पिके हातातून गेली होती. रब्बीच्या पिकातून शेतकऱ्यांना आशा होती. मात्र अवकाळी पाऊस बरसल्याने शेतात उभे असलेली पिके आडवी होऊन पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. होळीच्या दिवशी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या सुखाची होळी झाली आहे. कुटुंबासाठी लागणारा खर्च कसा भागवायचा, मायबाप सरकार आता जगायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. नुकसान झालेल्या पिकांची त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


शेतकरी दुहेरी संकटात:रब्बी हंगामातील गहू, मका ही पिके अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने भुईसपाट झाली आहे. तर कांदा ज्वारी, हरभरा आदी काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच शेतीमालाचे भाव गडगडलेले असताना आता शेतकरी सुलतानी, अस्मानी दुहेरी संकटात सापडला आहे. नुकसान झालेल्या पिकांना तातडीने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

धुळे जिल्ह्यातही नुकसान: मंगळवारी हवामान खात्याने दिलेल्या अंदानुसार, राज्यात २४ तासांमध्ये अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या ढगाळ वातावरण होते. त्यातही धुळे जिल्ह्याला मोठ्या गारपिटीचा सामना करावा लागला. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे केळी,मका, पपई या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. याशिवया गव्हाच्या पिकांवर रोगटा पडण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. होळीच्या दिवशी ६ मार्चच्या दुपारी तीन ते साडे चार वाजेच्या सुमारास धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पन्हाळी पाडा, खोरी, टिटाणे परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. गारपीट चा अक्षरशः खच साचलेला होता. काढणी झालेली आणि काढणीवर आलेले पीक हातचे गेल्याने, निसर्गाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने बळीराजा निराश झाला आहे. गहू, कांदा, मका, हरबरा, ज्वारी तसेच पालेभाज्या, फळबाग यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. होळीच्या दिवशी झालेल्या गारपिटीने रंगाचा बेरंग झाल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले आहेत.

हेही वाचा:Hema Malini Holi track : बॉलीवूडची ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांनी होळीच्या दिवशी रिलीज केली भक्तिगीते

ABOUT THE AUTHOR

...view details