औरंगाबाद- जिल्ह्यात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून जात असल्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पहावयास दिसत आहे.
दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासूनचजोरदार पाऊस झाला. खरीप पिकाच्या पेरणीच्या वेळेस पावसाचे यंदा आगमन झाले. दुष्काळ आणि कोरोनाच्या काळात टाळेबंदीच्या परिस्थितीशी सामना करणाऱ्या शेतकऱ्याला काहीसा दिलासा मिळाला. चांगला पाऊस झाल्याने यंदा शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या एक महिन्यापासून पैठण तालुक्यासह मराठवाड्यात सतत पाऊस सुरू आहे. बाजरी, मका, सोयाबीन, मूग, आणि कापसाची पिके सततच्या पावसाने आडवी पडली आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.