औरंगाबाद - बंदुकीचा धाक दाखवत असल्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. गौतम बाबासाहेब बनकर (रा. मिसारवाडी) आणि राजू शंकर खरात (रा. जुना मोंढा) असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
औरंगाबाद : बंदुकीचा व्हिडिओ तयार करून केला व्हायरल, गुन्हा दाखल - औरंगाबाद गुन्हेगारी
बंदुकीचा धाक दाखवत असल्याचा व्हिडिओ तयार करून, सोशल मीडियावर केला व्हायरल. व्हिडिओ करणाऱ्यांवर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या राजू खरात या व्यक्तीच्या नावे शस्त्र परवाना आहे. त्याने गौतम बनकर याला व्हिडिओ तयार करण्यासाठी बंदूक हाताळण्यासाठी दिली. त्यांनी बंदूक हाताळण्याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. १२ मे रोजी हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे पाहून, गुन्हे शाखेचे सहायक फौजदार विठ्ठल जवखेडे, जमादार शेख हबीब, विजय निकम, शिवलिंग होनराव, गोविंद पचरंडे, जायभाये यांनी या दोन्ही व्यक्तींना सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.