औरंगाबाद -कुटुंबातील महिलेचे डोहाळे जेवण ( Cow Dohale Program ) म्हणलं की समारंभ केला जातो. पिसादेवी भागात असाच समारंभ घेण्यात आला. ज्यामध्ये परिसरातील शंभरहून अधिक कुटुंबीय सहभागी झाले होते. जेवणाच्या पंगती उठल्या, या समारंभात महिलांचा उत्साह पाहण्यासारखा होता. हा सोहळा वेगळाच होता, करण डोहाळे जेवण होते ते सरदार कुटुंबियांच्या लाडक्या ( Kapila Cow Dohale ) कपिला गायीचे.
आठ दिवसांपासून केली होती तयारी -
पिसादेवी येथील दिशा निवारा भागातील संजय सरदार आणि कुटुंबियांची कपिला गाय आता आई होणार आहे. ही वार्ता मिळताच कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. कपिला कुटुंबातील एक भाग असल्याने तिचे डोहाळे जेवण करण्याचा मानस सरदार कुटुंबीयांनी मित्र परिवरकडे व्यक्त केला. आणि डोहाळे जेवण करण्याचं नक्की झालं. त्यानंतर मंगळवारी रात्री डोहाळे जेवणाची वेळ निश्चित करण्यात आली. गेल्या आठ दिवसांपासून या सोहळ्याची तयारी करण्यात आली. मित्र परिवाराला निमंत्रण देणे, खरेदी करणे, मंडप घालून अशी लगबग आठ दिवस पाहायला मिळाली.
गायीचे विधिवत पूजन -
गाईचे डोहाळे जेवण ठरल्यानंतर त्याची जय्यत तयारी करण्यात आली. एका महिलेचे पूजन करतो, त्या पद्धतीने गायीचे पूजन करण्यात आले. परिसरातील महिलांनी गायीचे औक्षण केले आणि कौतुकही केले. सर्व महिला सजून-धजून आल्या होत्या जणू एखादा लग्न समारंभ चा सोहळा असेल. सरदार कुटुंबियांच्या मित्र परिवाराने तर कपिलासाठी भेटवस्तू देखील आणल्या होत्या. आपल्या कुटुंबातील भाग असलेल्या कपिलाचा एखाद्या महिलेसारखे डोहाळे जेवण करण्यात आले.