महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Suicide In Aurangabad : एकमेकांना घट्ट मिठी मारत विष प्राशन करून दीर- भावजयची आत्महत्या - विष प्राशन करून जोडप्याची आत्महत्या

औरंगाबाद जिल्ह्यातल्या करमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ( Karmad Market Committee ) इमारतीसमोर विष प्रश्न करून जोडप्याने आत्महत्या केली ( Suicide By Consuming Poison ) आहे. या दोघांचे प्रेमसंबंध असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. एकमेकांना घट्ट मिठी मारत त्यांनी आत्महत्या केली ( Suicide By Hugging Each Other ) आहे.

आत्महत्या
आत्महत्या

By

Published : Feb 12, 2022, 3:16 PM IST

औरंगाबाद - करमाड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ( Karmad Market Committee ) इमारतीसमोर विष प्राशन केलेले एक प्रेमी जोडपे आढळून आले. पोलिसांनी तातडीने त्यांना औरंगाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तो पर्यंत त्यांचा मृत्यू झाला ( Suicide By Consuming Poison ) होता. या प्रकरणी करमाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांनी घेतले विष..

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीसमोर चालताना दोघांचेही झोक जात होता. विष प्राशन केल्याने चक्कर येत असल्यानं दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी ( Suicide By Hugging Each Other ) मारली. आणि क्षणांत दोघेही खाली कोसळले. हात-पाय तडफडत होते. दोघांनाही उलट्या होऊ लागल्या. परिसरातील नागरिकांनी या दोघांची अवस्था पाहून तत्काळ पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला फोन केला. रुग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर या दोघांनाही मृत घोषित केलं. जमलेल्या नागरिकांनी सांगितलेली ही आपबिती अतिशय धक्कादायक आहे.

कोण होते दोघे?

आत्महत्या केलेले हे दोघे दीर - भावजय असल्यांचं पोलिसांनी सांगितलं. करमाड पोलीस ठाण्यात आठ दिवसांपूर्वीच सदर महिला ही तिच्या बहिणीसह बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. आत्महत्या केलेली महिला ही गोलटगाव येथील बहिणीकडे मुलाच्या वाढदिवसासाठी आली होती. तेव्हापासून दोघी बहिणी बेपत्ता होत्या. दोन दिवसांपूर्वी एका बहिणीचा शोध लागला. तेव्हापासून दुसरीचा पोलीस शोध घेत होते. आत्महत्या केलेल्या महिलेचे तिच्यासोबतच आत्महत्या केलेल्या चुलत दिरासोबत प्रेमसंबंध असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details