महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घाटी रुग्णालयातील व्हेंटिलेटरच्या मॉनिटरवर आढळला कोरोनाचा विषाणू

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील व्हेटिलेटरच्या मॉनिटरवर कोरोनाचा विषाणू आढळा आहे. यामुळे रुग्णालय कर्मचाऱ्यांसह रुग्णांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.

घाटी
घाटी

By

Published : Jun 2, 2021, 8:02 PM IST

औरंगाबाद- शहरासह जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. घाटी रुग्णालयातील व्हेटिलेटरच्या मॉनिटरवर कोरोना विषाणू आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अतिदक्षता विभागातील उपकरणांची तपासणी

कोरोनाच्या अनुषंगाने सर्वच रुग्णालयांमध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातही स्वच्छतेची खबरदारी घेतली जात आहे. त्यात अति दक्षता विभागातील 60 ठिकाणांहून नमुने घेऊन त्याची चाचणी घेण्यात आली. यात एका व्हेंटिलेवरचा मॉनिटरवर कोरोनाचे विषाणू आढळून आले.

कोरोनाचा विषाणू पसरण्याची भीती रुग्णालयात असते. त्या अनुषंगाने रुग्णालयात निर्जंतुकीकण मोठ्या प्रमाणात केले जाते. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना सर्दी खोकल्या सारखे आजार असल्याने कोरोनाचे विषाणू जमिनीवर आणि वैद्यकीय उपकरणांवर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे घाटी रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील उपकरणांची तपासणी करण्यात आली होती. यासंदर्भात अधिक माहिती लवकरच दिली जाईल, अशी माहिती वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

हेही वाचा -औरंगाबादमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, बळीराजाची पेरणीसाठी लगबग

ABOUT THE AUTHOR

...view details