पैठण (औरंगाबाद) - 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना पहिला डोस तर 45 वयोगटातील नागरिकांना दुसरा डोस असे नियोजन करत पैठण येथील घाटी रुग्णालयात पुन्हा लसीकरण सुरू झाले आहे. मात्र, नागरिकांनी एकच गर्दी करत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवल्याचे पहायला मिळाले.
पैठणमध्ये कोरोना लसीकरण पुन्हा सुरु; लसीकरणासाठी नागरिकांची झुंबड
जिल्हा प्रशासनामार्फत पैठण येथील ग्रामीण रुग्णालयाला लसीचा सुरळीत पुरवठा झाल्याने लसीकरण पुन्हा एकदा सुरु करण्यात आले आहे. मात्र नियोजन अभावी लस कोणासाठी आणि कशी ते माहीत नसल्याने पैठण येथील ग्रामीण रुग्णालयात नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
गेल्या आठ दिवसापासून पैठण तालुक्यात लसीकरण बंद पडले होते. मात्र आज (गुरुवार) जिल्हा प्रशासनामार्फत पैठण येथील ग्रामीण रुग्णालयाला लसीचा सुरळीत पुरवठा झाल्याने लसीकरण पुन्हा एकदा सुरु करण्यात आले आहे. मात्र नियोजन अभावी लस कोणासाठी आणि कशी ते माहीत नसल्याने पैठण येथील ग्रामीण रुग्णालयात नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. आलेली लस कोणाला आणि कशी देणार याबाबत नियोजन नसल्याने ही गर्दी झाल्याचे दिसून आले. ज्या 18 ते 44 वयोगटाततील नागरिकांनी ॲपद्वारे रजिस्ट्रेशन केले अशा दोनशे लोकांची रजिस्टर्ड यादी प्राप्त झाली असून त्याच लोकांना आज लस दिली जाणार, तर 45 वयोगटाच्यावरील नागरिकांना दुसरा डोस देण्यात येणार आहे.
हेही वाचा -नाशिकमध्ये आईचा कोरोनाने मृत्यू, तरुणीने कोव्हिड सेंटरमध्येच सॅनिटायझर घेऊन केली आत्महत्या