महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाचोड येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राचे मंत्री भुमरे यांच्या हस्ते शुभारंभ - aurangabad breaking news

पैठण तालुक्यातील पाचोड ग्रामीण रुग्णालय येथे कोविड सेंटरमध्ये या लसीकरणाचा फल उत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले.

लस
लस

By

Published : Jan 16, 2021, 7:38 PM IST

पैठण (औरंगाबाद) - पैठण तालुक्यातील पाचोड ग्रामीण रुग्णालय येथे कोविड सेंटरमध्ये या लसीकरणाचा फल उत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले. पैठण तालुक्यातील पाचोड येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. सुनील चव्हाण त्यांनी भेट देत सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर शंभर आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे.

कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये

पाचोड येथील लसीकरण केंद्रावर डॉ. संदीप काळे शिवाजी भोजने व राहुल दवणे यांनी सर्वप्रथम लस घेतली. लस घेतल्यानंतर कुठलाही त्रास होत नाही, अशक्तपणा जाणवत नाही किंवा आराम करण्याचीही गरज भासत नाही. ही लस सर्वांनी घेण्यास काही हरकत नाही, अशा प्रतिक्रिया माध्यमांना दिले आहेत.

पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांचेही ओळपत्र तपासून सोडले केंद्रावर

पाचोड ग्रामीण रुग्णालय येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा केंद्राचा शुभारंभ केल्यानंतर या केंद्रामध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे या केंद्राची तपासणी करण्यासाठी आले असता बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी असल्याचे सांगूनही जिल्हाधिकाऱ्यांना आपले ओळखपत्र दाखवल्यानंतर आत प्रवेश दिला जाईल, असे म्हणत गेटवरच थांबवले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ओळखपत्र दाखवून लसीकरण केंद्रात प्रवेश केला.

हेही वाचा -औरंगाबादमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात; 5 केंद्रावर लसीकरण

ABOUT THE AUTHOR

...view details