औरंगाबाद- जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनाबधित व्यक्तीच्या वडिलांनाच कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत औरंगाबादेत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे. यामुळे औरंगाबदकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
औरंगाबादकरांच्या चिंतेत भर; कोरोनाबाधितांची संख्या वाढली, अहवाल पुनर्तपासणीसाठी पुण्याला - corona patient number raised in aurangabad
2 रुग्ण एकाच दिवशी आढळून आल्याने प्रशासनाने तातडीने उपाय योजना करायला सुरुवात केली. सिडको एन 4 चा परिसर आणि आरेफ कॉलनी प्रशासनाने सील केल्या. हे रुग्ण ज्या लोकांच्या संपर्कात आले त्या सर्व लोकांची तपासणी करण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी सिडको परिसरातील एका महिलेला तर आरएफ कॉलनीत राहणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दोन्ही रुग्ण राहत असलेले परिसर सील करण्यात आले आहेत. या दोघांच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीत रुग्णाच्या वडिलांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
औरंगाबादमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एकच रुग्ण आढळून आला होता. तो रुग्णदेखील उपचार घेऊन घरी गेला होता. आता सर्वत्र लॉकडाऊन असल्याने रुग्ण वाढणार नाही, असे वाटत असताना सिडको एन 4 भागातील एका 55 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तर आरएफ कॉलनीतील एका 35 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. आरेफ कॉलनीत आढळून आलेल्या रुग्णाच्या वडिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा अहवाल आल्यावर त्यांचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. त्यानंतर याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.