औरंगाबाद- कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात मागील चार दिवसांमध्ये कोरोनामुळे तिघांचे मृत्यू झाले आहेत. रविवारी सातारा देवळाई येथील 55 वर्षीय व्यक्तीला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. अहवाल आल्यानंतर दीड तासातच रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ कानन येळीकर यांनी दिली.
औरंगाबादेत कोरोनाचा दहावा बळी, सातारा देवळाई येथील रुग्णाचा मृत्यू - corona cases in aurangabad
रविवारी सातारा देवळाई येथील 55 वर्षीय व्यक्तीला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. अहवाल आल्यानंतर दीड तासातच रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ कानन येळीकर यांनी दिली.
औरंगाबादेत कोरोनाचा दहावा बळी
रुग्णाला तीन वर्षांपासून मधुमेह, दमा, चक्कर येणे, खोकला असे आजार होते. या घटनेनंतर औरंगाबादेतील कोरोनाबाधित मृतांची संख्या 10वर पोहोचली झाली आहे. रविवारी दिवसभरात 26 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल प्राप्त झाले होते. सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या 283 असून त्यापैकी 25 रुग्ण बरे झाले आहेत. उर्वरित रुग्णांवर जिल्हा आणि घाटी रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.