महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना बाधित रुग्णाचा शौचालयात गुदमरून मृत्यू.?, कुटुंबियांचा आरोप - औरंगाबाद शहर बातमी

औरंगाबाद जिल्हा रुग्णालयात एका कोरोना बाधित रुग्णाचा शौचालयात गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा रुग्ण तब्बल साडेचार तास ऑक्सिजनविना शौचालयांमध्ये पडून होता. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

कोरोना
कोरोना

By

Published : Mar 29, 2021, 10:01 PM IST

Updated : Mar 29, 2021, 10:07 PM IST

औरंगाबाद - जिल्हा रुग्णालयात एका कोरोना बाधित रुग्णाचा शौचालयात गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा रुग्ण तब्बल साडेचार तास ऑक्सिजनविना शौचालयांमध्ये पडून होता. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

मध्यरात्री शौचालयात पडले बेशुद्ध

रात्रीच्या सुमारास शौचालयात गेलेले रुग्ण चक्कर येऊन शौचालयात पडले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. तब्बल चार तास गुलाबराव परत न आल्यामुळे इतर रुग्णांनी तक्रार केल्यानंतर रुग्णालय कर्मचाऱ्यांनी जाऊन तपासणी केली असता शौचालयात दार बंद होते. त्यानंतर दरवाजा तोडून पाहिले असता ते बेशुद्धावस्थेत पडल्याचे समोर आल. त्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांनी देत तब्बल साडेचार तास जिल्हा रुग्णालयाने लक्ष न दिल्यामुळे गुलाबराव यांच्या मृत्यू झाल्याचा आरोप केला.

ऑक्सिजन मात्रा कमी झाल्याने मृत्यू झाला

ही घटना आज (दि. 29 मार्च) सकाळी साडेपाच घडली असून रुग्णांने स्वच्छतागृहाचा दरवाजा आतून उघडता येत नसल्याचे सांगितले. स्वच्छतागृहाचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढले तेव्हा तो रुग्ण जिवंत होता. त्यानंतर त्यांना ऑक्सिजन दर मि. 15 लिटर या वेगाने होता. पण, त्यांची प्रकृती अचानक खालावली म्हणून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र, सकाळी 7 वाजून 40 मिनीटांनी त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.

हेही वाचा -विवाह सोहळ्यात गर्दी जमवल्याप्रकरणी मंगल कार्यालय चालकावर गुन्हा दाखल

Last Updated : Mar 29, 2021, 10:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details