औरंगाबाद- कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्याच्या जोडीला नागरिकांकडूनदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती होत आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका सरला कामे या बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर जनजागृती करत आहेत.
औरंगाबादमध्ये बाहुल्यांच्या खेळातून कोरोना जनजागृती - corona aurangabad
औरंगाबादच्या आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या असलेल्या सरला कामे या कोरोनाबाबत बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून आजार काय आहे, त्याची लक्षणे काय आहेत, आजार होऊ नये यासाठी काय करावे, अशी माहिती नागरिकांना देत आहे.
सरला कामे अजिंठा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहे. विद्यार्थ्यांना बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रम शिकवण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. आपल्या कलेचा वापर करत सरला यांनी आता लोकांना कोरोना विषाणूबाबत जागृत करण्याचे काम सुरू केले आहे. औरंगाबादच्या आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या असलेल्या सरला कामे या कोरोनाबाबत बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून आजार काय आहे, त्याची लक्षणे काय आहेत, आजार होऊ नये यासाठी काय करावे, अशी माहिती नागरिकांना देत आहे. बाहुल्यांच्या खेळातून मनोरंजन होऊन नागरिकांना जागरूक करण्याचा प्रयत्न त्या करत आहे. याद्वारे काही लोक जागरूक झाले तर आपले प्रयत्न सफल होईल, अशी मनोकामना सरला कामे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा-लॉकडाऊन इफेक्ट : प्रसिद्ध कलाकारांचे प्रेक्षकांसाठी फेसबुकवर ऑनलाइन मनोरंजन