महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Minister Raosaheb Danve : रावसाहेब दानवे यांचे वादग्रस्त विधान, नव्या वादाला झाली सुरुवात - minister Raosaheb Danve Controversy

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आपल्या बेताल वक्तव्यांमुळे अनेक वेळा चर्चेत राहिले (Controversy started minister Raosaheb Danve) आहेत. आता त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला आहे. रावसाहेब दानवे यांच्या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला सुरुवात झाली (Danve single mention of Shivaji Maharaj name) आहे.

Minister Raosaheb Danve
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

By

Published : Dec 5, 2022, 8:33 AM IST

औरंगाबाद :शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज्यपालांच्या विरोधात राज्यभर पडसाद उमटत असताना केंद्रीय मंत्रीरावसाहेब दानवे (Minister Raosaheb Danve ) यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने सरकार पुन्हा अडचणीत सापडले आहे. राज्यात शिंदे - फडणवीस सरकार मधील नेत्यांच्या वक्तव्यामुळे वेगवेगळ्या वादांना तोंड फुटत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात चालले काय असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला (minister Raosaheb Danve Controversy) आहे.


मी पण शिवप्रेमी :रावसाहेब दानवे यांनी आपण शिवप्रेमी असल्याचं सांगत, त्याच्याबाबत केलेल्या वक्तव्याची चौकशी व्हावी. ते विधान त्यांचा अवमान करण्यासाठी होत का? याची चौकशी व्हावी अस म्हणत असताना त्यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. रविवारी दिवसभर मराठा संघटनांनी एकत्र येत राज्यातील मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करत राज्यपाल हटावा अशी मागणी केली. त्यानंतर लगेच हा व्हिडिओ समजमध्यामांवर आल्याने पुन्हा राजकारण तापणार हे नक्की. याबाबत राजकीय पक्षांनी टीका करायला सुरुवात केली आहे. याआधी रावसाहेब दानवे अडचणीत आले (single mention of Shivaji Maharaj name) होते.

माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

बेताल वक्तव्य :केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आपल्या बेताल वक्तव्यांमुळे अनेक वेळा चर्चेत राहिले आहेत. रविवारी त्यांची एक व्हिडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. मात्र त्यांची ही काही पहिली वेळ नाही. याआधी त्यांनी शेतकऱ्यांना उद्देशून बेताल वक्तव्य केले. त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. राज्यपालांनी केलेले वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत (Danve single mention of Shivaji Maharaj name) आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details