छत्रपती संभाजीनगर :(औरंगाबाद) नामांतनाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनात एआयएमआयएम कार्यकर्त्यांनी औरंगजेबाचे फोटो झळकावल्याने नव्या वादाला तोंड फुटल आहे. यामुळे वातावरण खराब होईल असा आरोप उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. तर कोणीतरी खोडसाळपणे आंदोलनाला वेगळी दिशा देण्यासाठी त्या व्यक्तीला पाठवलं असा स्पष्टीकरण खासदार इम्तियाज जलील यांनी केल आहे.
औरंगजेबाचा फोटो लावल्याने वाद :शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर एक आठवड्यानी एआयएमआयएम पक्षाने नामांतर विरोधी आंदोलनाला सुरुवात केली. खासदार इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेले आंदोलनात दुपारच्या वेळी काही कार्यकर्त्यांनी राजा औरंगजेबाचे पोस्टर हातात घेऊन घोषणाबाजी केली. त्यामुळे शहरातील सुरू असलेला आंदोलन वेगळ्या चर्चेत आले. अत्याचारकारी राजाचा फोटो घेऊन काय सिद्ध करत आहे अशी टीका सोशल मीडियावर व्हायला सुरुवात झाली. मात्र, त्यावर खासदार जलील यांनी स्पष्टीकरण देत कोणीतरी खोडसाळपणे आंदोलनात हातात फोटो घेऊन युवकाला पाठवल्याचा आरोप केला आहे. आंदोलनाचा मोठा परिणाम झाला असता म्हणून, मुद्दामून कोणीतरी कृत्य केले असावे असे खासदार जलील म्हणाले. मात्र, आमच्या लक्षात ही बाब आल्यावर, आम्ही त्या युवकाला आंदोलनातून बाहेर काढले असे इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे.