औरंगाबाद - मनपातील ठेकेदारांची मागील दीड वर्षांपासून थकीत बिले मिळालेले नाहीत. रमजान ईदच्या अगोदर प्रत्येकाला किमान ५ लाख रुपये देण्यात यावेत, या मागणीसाठी मागील ९ दिवसांपासून ठेकेदार बेमुदत उपोषण करीत आहेत. यामुळे शहरातील अनेक कामे खोळंबली आहेत. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा ठेकेदारांनी घेतला आहे.
बिले न मिळाल्याने औरंगाबाद पालिकेतील ठेकेदारांचे बेमुदत उपोषण - Sachin Jire
आर्थिक संकटात असलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेने दीड वर्षांपासून ठेकेदारांचे थकीत बिल दिले नाही. यामुळे ठोकेदार पालिकेसमोर उपोषणाला बसले आहेत.
आर्थिक संकटात असलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेकडे कामे करणाऱ्या ठेकेदारांना बिले देण्यासाठी पैसे नसल्याने गेल्या दीड वर्षांपासून लहान-मोठ्या अशा शेकडो ठेकेदारांची बिले प्रलंबित आहेत. कामाची बिले मिळावी यासाठी यापूर्वीदेखील ठेकेदारांनी पालिका आयुक्तांच्या कक्षासमोर ठिय्या मांडला होता. सर्वसाधारण सभेच्यावेळी सभागृहाबाहेरही ठिय्या आंदोलन केले होते. अनेक वेळा निवेदने दिले होती. मात्र, याच काहीच फायदा न झाल्याने मागील आठ दिवसांपासून ठेकेदार पालिका प्रवेशद्वारसमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत प्रत्येक ठेकेदाराला ५ लाख रुपये देण्यात येणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा ठेकेदारांनी घेतल्याने पालिकेसमोर पेच निर्माण झाले आहे. परिणामी शहरातील अनेक कामे रखडली असल्याचे चित्र दिसत आहे.