औरंगाबाद - कोरोना लॉकडाऊन, पैशांची आवक कमी, घरात रोज लागणाऱ्या वस्तूंचे वाढते भाव यामुळे सामान्य लोकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यात भर म्हणून मागील आठवड्यापासून भाज्यांचे भावही दुप्पट झाले आहेत. त्यामुळे भाजी मंडईकडेही नागरिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
भाजीपाल्याचे भाव कडाडले; भाजी मंडईकडे ग्राहकांची पाठ - औरंगाबाद भाजीपाला दरवाढ न्यूज
घरात रोज लागणाऱ्या वस्तूंचे वाढते भाव यामुळे सामान्य लोकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यात भर म्हणून मागील आठवड्यापासून भाज्यांचे भावही दुप्पट झाले आहेत. त्यामुळे भाजी मंडईकडेही नागरिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. भाजी मंडईमध्ये भाज्यांची आवक आणि ग्राहक कमी झाल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मागील काही दिवसात पडणाऱ्या पावसामुळे भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्याचाच परिणाम भाज्यांच्या दरावर झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातील भाजी मंडईमध्ये भाज्यांची आवक आणि ग्राहक कमी झाल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
भाजीचे अगोदरचे व आत्ताचे दर (प्रती किलो) -
बटाटा - २५,३० - ४०
कांदा - १५ - २०
टमाटे - २० - ४०
मिरची - ६० - ८०
लिंबू - ६० - ८०
शेवगा - ६० - १००
भेंडी - ५० - ९०
गवार - ६० - ८०
कोथिंबीर - १० (१ गड्डी) - २०
पालक - १० (१ गड्डी) - १५
मेथी - १० (गड्डी) - २०
काकडी - २० - ४०
दोडके - ६० - ९०
फ्लॉवर - ४० - ८०
शिमला मिरची - ५० - ७०