छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज छत्रपती संभाजी नगर शहरातील गुलमंडी परिसरातील सुपारी हनुमान मंदिरात आरती केली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधत टीका केली. आज बजरंग बलीचा दिवस आहे. बजरंगबलीनेच भाजपला चारी मुंड्या चित केलं अशा शब्दात टीका केली. तसेच भाजप कर्नाटकमध्ये लूट करून राज्य करत होतं, कुठल्याही निवडणुकीत धर्मा आणायला नको. मात्र भाजपने राम रहीम यांच्या नावावर राजकारण केलं अशी देखील टीका पाटोले यांनी केली. तसेच येणाऱ्या 2024 च्या महाराष्ट्र निवडणुकीत काँग्रेस हा महाराष्ट्रातील एक नंबरचा पक्ष राहील असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
Nana Patole On Karnataka Result : भाजपला हनुमानाने चारीमुंड्या चीत केले - नाना पटोले - भाजप कर्नाटकमध्ये लूट करून राज्य करत होतं
देवाचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना आज हार मानवी लागली. आज शनिवार बजरंगबलीचा दिवस आहे, बजरंगबलीने भाजपला चारीमुंड्या चीत केले. मी हिंदू आहे म्हणून इतर धर्मियांवर अन्याय करण्याचा अधिकार मला कोणीही दिलेला नाही. मी उपासक असल्याने पूजा करण्यासाठी हनुमान मंदिरात आलो, अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
महाविकास आघाडी सोबत चर्चा :कर्नाटक येथे मिळालेल्या विजयने नवीन चैतन्य संचारल आहे. महाराष्ट्रात देखील काँग्रेस सर्वाधिक जागा निवडून आणेल, याबाबत महाविकास आघाडी सोबत चर्चा करून जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल. राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासारखे शालिन नेते आमच्याकडे आहेत. ब्लॅकमेल करणारे लोक सत्तेत बसले आहेत. आमचं 40% कमिशन घेणार सरकार नसेल. लोकशाही मानणारा आमचा पक्ष असून आमदार ठरवतील तोच नेता मुख्यमंत्री पदी असेल असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं. जनता राजा असतो मात्र दिल्लीत बसणारे स्वतःला राजा समजत आहेत. जनतेला ईव्हीएमवर विश्वास नाही, मात्र आम्हाला त्याचा फार्मूला सापडला आहे. बहुमताच्या जोरावर मशीन आमच्या ताब्यात आली, अशी टीका नाना पाटोले यांनी केली.
हेही वाचा -
- Param Bir Singh : फडणवीसांचा मोहरा पुन्हा चाकरीसाठी तयार; काँग्रेसचा परमबीर सिंहांवरून घणाघात
- Karnataka Election Result 2023 : नागरिकांना बदल हवा आहे म्हणत काँग्रेस कार्यालयात जल्लोष सुरू, भाजप, जेडीएस नेते हवालदिल
- Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात भाजपाचं पानीपत होण्यासाठी कारणीभूत ठरले corruption, commission, आरक्षण
- D K Shivakumar: ‘जायंट किलर’ डी. के. शिवकुमार! कर्नाटक काँग्रेसच्या विजयाचे हकदार