औरंगाबाद - इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षाने सेवनहील परिसरातील राज पेट्रोल पंप येथे आंदोलन केले. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्व सामान्यांना महागाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकार विरोधी घोषणाबाजी केली.
'पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे महागाई वाढली'
गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल डिझेल दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. सत्तर ते ऐंशी रुपये लिटर असणाऱ्या पेट्रोलने शंभरी गाठली आहे. परिणामी प्रवास महागला आहे. वाहतूक महागल्याने सामानाची वाहतूक महागली, त्यामुळे सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याने केंद्र सरकारने त्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने केली आहे.
'तेलाचे दर वाढल्याने नागरिक त्रस्त'