महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Aurangabad News : चालत्या बसमधून ग्रामीण भागात संगणक प्रशिक्षण;  साडेपाच हजार विद्यार्थ्यांनी घेतला फायदा - विद्यार्थ्यांना मिळाले संगणक प्रशिक्षण

संगणक प्रशिक्षण मिळावे याकरिता, इंड्यूरन्स कंपनीच्या मार्फत सेवक फाउंडेशनच्या माध्यमातून बसमध्येच प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. वीस संगणकांसोबत एक प्रशिक्षक अशा पद्धतीने ही बस सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत साडेपाच हजार विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करण्यात आले आहे.

Aurangabad News
चालती बस ग्रामीण भागात देतेय सर्वांना संगणक प्रशिक्षण

By

Published : Feb 5, 2023, 11:33 AM IST

Updated : Feb 5, 2023, 11:41 AM IST

चालती बस ग्रामीण भागात देतेय सर्वांना संगणक प्रशिक्षण

औरंगाबाद : आपण सर्वांनी आतापर्यंत हॉस्पिटल ओन व्हील, हॉटेल ऑन व्हील अशा संकल्पना पाहिल्या आहेत. ज्यामध्ये एका बस किंवा वाहनामध्ये सर्व सुविधा सज्ज करून त्या नागरिकांपर्यंत पोहोचल्या जातात. मात्र अशी सुविधा शिक्षणाच्या बाबतीत उपलब्ध करून देण्यात आली आहे. सेवक ट्रस्ट च्या माध्यमातून ग्रामीण भागात सुरू असलेली बस सध्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. संगणक ही काळाची गरज आहे. मात्र, अद्यापही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना किंवा महिलांना त्याचे ज्ञान नसते. ते शिक्षण आता यामाध्यमातून पुरवण्यात येणार आहे. आजच्या काळात बँकेचे व्यवहार असो की जमिनीचे, सर्वच गोष्टी संगणकाच्या माध्यमातून केल्या जातात. त्यामुळे संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. मात्र ग्रामीण भागात सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना किंवा गावातील रहिवाशांना इच्छा असूनही शिक्षण घेणे आजही अवघड मानले जाते. मात्र कंपनीच्या माध्यमातून ही बस आता गावात जाऊन शिक्षण देण्याचे काम करत आहे.



अशा पद्धतीने मिळते शिक्षण :एज्युकेशन ओन व्हील या संकल्पनेनुसार ही बस तयार करण्यात आली आहे. इंड्यूरन्स कंपनीच्या सेवक फाउंडेशन तर्फे वीस संगणक असलेली सुसज्ज अशी संगणक प्रशिक्षण लॅब सुरू करण्यात आली आहे. इंड्यूरन्स कंपनीच्यावतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात, त्यातून काही दत्तक घेऊन तिथे विविध विकासकामे करण्याचे काम काही वर्षात करण्यात आले. गावातील शेतकरी महिला आणि युवक संगणकाच्या ज्ञानापासून वंचित असल्याचे दिसून आले. त्यांना संगणक साक्षर करण्यासाठी या गाडीची संकल्पना सुरू करण्यात आली. राज्यातील ही एकमेव मोठी संगणक बस असल्याचे मानले जात आहे. पहिलीपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांना वेगवेगळ्या पद्धतीचे ज्ञान या बसमध्ये दिले जात आहे. जिल्हा परिषद शाळेतील चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना डिजिटल स्कूल म्हणून त्याच्या माध्यमातून ज्ञान देण्यात येत आहे. तर त्या पुढील विद्यार्थ्यांना संगणकाची प्राथमिक माहिती आणि प्रशिक्षण देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना ऑनलाइन कामकाज करण्याबाबत शिक्षित केले जात आहे. त्यामुळे कमी शिक्षित असलेला शेतकरी देखील ऑनलाईन सातबारा काढू शकतो.


"सोलर"वर चालतात संगणक :या बसचे वैशिष्ट्य म्हणजे तिला वीज लागत नाही. बसच्या छतावर सोलर पॅनल लावण्यात आले आहेत. तर खाली मोठ्या प्रमाणात बॅटरी बसवण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून वीस संगणक चालवले जातात. दिवसभरातून शंभर विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे काम केले जात आहे. बस मोठी असल्याने गावात जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रस्त्यावर असणाऱ्या झाडाच्या फांद्यांमुळे सोलर पॅनल खराब होण्याची भीती असते, त्यामुळे धोका ओळखून आधीच बस थांबवत त्या फांद्या कापून गाडी पुढे न्यावी लागते. तर पुढे मोठा खड्डा असेल तर तो खड्डा देखील बसमधील चालक स्वतः भरतात आणि मग बस पुढे नेतात, अशी माहिती देण्यात आली.


हेही वाचा :Vani Jairam Passes Away : प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गजांनी व्यक्त केला शोक

Last Updated : Feb 5, 2023, 11:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details