औरंगाबाद - बाहेर जिल्ह्यातून विनापरवाना स्वगृही येणाऱ्या कन्नड़ तालुक्यातील जेहूर तांडा येथील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायद्याचे उल्लघंन केल्याप्रकरणी देवगाव रंगारी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. विना परवाना प्रवास करणाऱ्या व त्यांना आश्रय देणाऱ्या परिवाराविरोधातही गुन्हा दाखल करण्याचा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांनी दिला आहे.
परजिल्ह्यातून विनापरवाना प्रवास, कन्नड तालुक्यातील दोघांविरोधात गुन्हा दाखल - aurangabad lockdown
बाहेर जिल्ह्यातून विनापरवाना स्वगृही येणाऱ्या कन्नड़ तालुक्यातील जेहूर तांडा येथील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायद्याचे उल्लघंन केल्याप्रकरणी देवगाव रंगारी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. विना परवाना प्रवास करणाऱ्या व त्यांना आश्रय देणाऱ्या परिवाराविरोधातही गुन्हा दाखल करण्याचा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांनी दिला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी औराळा परिसरात पोलीस गस्त घालत होते. यावेळी जेहुर तांडा येथील रमेश मंगु राठोड व त्याची पत्नी अलका राठोड हे त्यांच्या 3 मुलांसह विनापरवाना जिल्ह्यात आले. मागील चार वर्षांपूर्वी ते मालेगांव येथे रोजगारानिमित्त स्थलांतरीत झाले होते. लॉकडाऊनदरम्यान त्यांनी आपल्या गावचा रस्ता पकडला.
संचारबंदीचे उल्लघंन केल्याप्रकरणी या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राठोड कुटुंबातील सदस्यांची औराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.