महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपा आमदार प्रशांत बंब यांच्यावर गुन्हा दाखल, कारखान्याच्या सभासदांची फसवणूक केल्याचा आरोप - aurangabad police

भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. बनावट दस्ताऐवज प्रकरणी प्रशांत बंब यांच्यासह 16 जणांवर गुन्हे दाखल झाले.

भाजपा आमदार प्रशांत बंब
भाजपा आमदार प्रशांत बंब

By

Published : Nov 19, 2020, 9:43 AM IST

Updated : Nov 19, 2020, 5:18 PM IST

औरंगाबाद -औरंगाबाद गंगापुरचे भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. बनावट दस्तावेज खरा असल्याचे भासवीत गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. बनावट दस्ताऐवज प्रकरणी प्रशांत बंब यांच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गंगापूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा पाटील डोणगावकर

15 कोटी 75 लाख 33 हजार 338 रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणी कृष्णा पाटील डोंगावकर यांनी तक्रार दिली आहे. बनावट ठराव घेऊन, आमदार बंब आणि बी. एम. पाटील यांनी पटर्नशिपमध्ये कारखाना दाखवला आहे.

कृष्णा पाटील डोणगावकर
काय आहे प्रकरण...

गंगापूर सहकारी साखर कारखाना 2007-2008 पासून बंद आहे. कर्ज थकीत असल्याने राज्य सहकारी बॅंकेने कर्जवसुली पोटी कारखाना विक्रीसाठी काढला होता. मात्र त्यावेळी संचालक मंडळ यांनी न्यायालयीन कारवाई सुरू केली होती. या कारवाईत न्यायालयात कारखान्याच्या वतीने 9 कोटी रुपये जमा करण्यात आले होते. न्यायालयाने ती रक्कम कारखान्यात परत केली असून, ती व्याजासह 15 कोटी 75 लाख 33 हजार 338 रुपये एवढी झाली आहे.

संगनमताने बेकायदेशीररीत्या कारखान्याचे खाते उघडले

मात्र कारखान्याचे चेअरमन आमदार बंब व प्रभारी कार्यकारी संचालक बी एम पाटील यांनी संगनमताने बेकायदेशीररीत्या कारखान्याचे खाते उघडले. खाते उघडण्यासाठी ठराव घेण्यात आला होता. पण हा ठराव सुद्धा बनावट आहे. कारखाना ही पार्टनरशिप फर्म असल्याचे दाखविण्यात आले. व त्यात आमदार बंब आणि बी. एम. पाटील हे पार्टनर आहेत. अशा प्रकारचा खोटा दस्तावेज दाखवण्यात आल्याचा आरोप कृष्णा पाटील डोणगावकर यांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

कोण आहेत प्रशांत बंब?-

प्रशांत बंब भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. महाराष्ट्रातील गंगापूर विधानसभा मतदार संघातून ते तीन वेळा निवडून आले आहेत. भाजपमध्ये येण्या पुर्वी ते अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. सभागृहात आणि सभागृहा बाहेर त्यांनी अनेक वेळा सरकारमधील भ्रष्टाचारा बाबत आवाज उठवला होता. मात्र आता त्यांच्यावर भ्रष्टाचार आरोप झाला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

हेही वाचा-देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

हेही वाचा-उघडले देवाचे दार : राज्यातील मंदिरातील परिस्थिती काय?

Last Updated : Nov 19, 2020, 5:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details