महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादेत ३५ वर्षीय युवकाची बाथरुमच्या ॲंगलला गळफास लावून आत्महत्या - Aurangabad suicide case

मागील दोन अडीच महिन्यापूर्वीच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र कुटूंबियांच्या सतर्कतेमुळे तो वाचला. दरम्यान त्याने आपल्याला जगावेसे वाटत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. त्याने काही दिवसापूर्वी दारुचे व्यसन सोडले होते. मात्र त्याच्या मनात काय आहे हे कळत नव्हते अशी माहिती नातेवाईकानी दिली.

Aurangabad latest suicide case
औरंगाबादेत ३५ वर्षीय युवकाची आत्महत्या

By

Published : May 28, 2021, 7:07 AM IST

औरंगाबाद -रोकडिया हनुमान कॉलनीतील प्लंबरचे काम करणाऱ्या ३५ वर्षीय युवकाने बाथरुमच्या ॲंगलला गळफास लावून घेत आत्महत्या केली. अनंत तातेराव गायकवाड (३५, रा. रोकडिया हनुमान कॉलनी) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. त्या युवकाने साधारण दोन ते अडीच महिन्यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे.

अनंत गायकवाड हा तरुण प्लंबरचे काम करतो. त्याची आई आणि पत्नी धुणीभांडी करतात. लॉकडाऊनमुळे कामेही बंद होती. यातून मागील दोन अडीच महिन्यापूर्वीच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र कुटूंबियांच्या सतर्कतेमुळे तो वाचला. दरम्यान त्याने आपल्याला जगावेसे वाटत नसल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्याने काही दिवसापूर्वी दारुचे व्यसन सोडले होते. मात्र त्याच्या मनात काय आहे हे कळत नव्हते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. अनंत याच्या घरी पाहूणे आलेले असल्याने त्याने पाहूणे आणि कुटूंबियासोबत गुरुवारी २६ रात्री साडे अकरापर्यंत गप्पा मारल्या. नंतर तो झोपायला गेला. सकाळी पावणे आठ वाजताच्यादरम्यान घराच्या बाजूलाच असलेल्या पत्र्याच्या बाथरुमधील ॲंगलला त्याने गळफास घेतल्याचे कुटूंबाच्या लक्षात आले.

त्याला खाली उतरवत पोलिसांना माहिती दिली असता, नातेवाईकांच्या मदतीने त्याला पोलिस व्हॅनमध्ये घाटीत दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून अनंत याला मृत घोषित केले. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा - धोका वाढला! व्हाइट फंगसमुळे आतड्यात पडले छिद्र; जगातील पहिलीच केस

ABOUT THE AUTHOR

...view details