महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 23, 2021, 4:26 PM IST

ETV Bharat / state

सिल्लोडमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू

गारपिटीचा फटका बसलेल्या घाटनांद्रा, धारला, आमठाणा इत्यादी भागात शेताच्या बांधावर जाऊन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानीची पाहणी केली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले होते.

अवकाळी नुकसान पाहणी
अवकाळी नुकसान पाहणी

सिल्लोड (औरंगाबाद) - सोयगाव तालुक्यात विविध ठिकाणी गेल्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस बरसला. यात कांदा, गहू, मका, सूर्यफूल इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा, असे निर्देश महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले होते. त्या अनुषंगाने आता महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. सोमवारी (काल) तालुक्यातील चारनेर, चारनेरवाडी, धारला, आमठाणा, देऊळगाव बाजार इत्यादी भागात महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे.

मंत्र्यांच्या आदेशानंतर पंचनामे सुरु

तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे नुकसान झालेल्या घाटनांद्रा, धारला, आमठाणा इत्यादी भागात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले होते. नेमके किती नुकसान झाले हे समोर आल्यानंतर सरकार योग्य तो निर्णय घेईल, असे सूतोवाच राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले होते. त्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहेत.

हेही वाचा-अरविंद सावंतांविरोधात पोलिसांत जाणार; खासदार नवनीत राणांची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details