औरंगाबाद : गोदावरीला पूर (Godavari floods ) म्हटलं की वैजापूर तालुक्यातील शिंदेवस्तीत सर्वात आधी पाण्याखाली येते व वस्तील लोकांना स्थलांतरीत करावे लागते. पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळं गोदावरी नदीकाठच्या भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ,जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, ग्रामीण पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया (Rural Police Superintendent Manish Kalwania) यांच्यासह व जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा भागात थेट ट्रकटरने जाऊन परिस्थितीतचा आढावा घेतला (The tractor went and surveyed the situation )आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आव्हान केले-सराला बेट (Sarala Island )लगत चहूबाजूंनी पाण्याने वेढा दिलेल्या शिंदे वस्तीवरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्याच्या आवाहनाला करण्यात आले होते, परंतु नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही. वस्ती पर्यंत पुराचे पाणी पोहोचत नसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. वस्तीचे दळणवळण सक्षम करण्यासाठी रस्ते आणि पुलाचे बांधकाम करण्याची मागणी रहिवासी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील विविध धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग कमी केल्यामुळे पूर परिस्थिती ओसरली आहे. त्यामुळं सध्या तरी चिंता जनक परिस्थिती नाही असे येथील चित्र आहे.