औरंगाबाद -राष्ट्रवादी आणि एमआयएम मध्ये सोमवारी संध्याकाळी चांगलाच राडा झाला. यावेळी खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीचे कादिर मौलाना उपस्थित होते. जलील यांच्या अंगावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते धावून आल्याने हा सर्वप्रकार घडला. या प्रकरणी एमआयएमच्या वतीने पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. मात्र, या घटनेमुळे कटकट गेट भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
औरंगाबाद : एमआयएम राष्ट्रवादीत राडा; खासदार जलील यांच्या अंगावर धावून आल्याने तणाव हेही वाचा -मतदान करा आणि लाडू खा; कुलस्वामिनी प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम
एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कटकट गेट भागात आपसात भिडले. यावेळी इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कादिर मौलाना हे समोरा समोर आले होते. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खासदार जलील यांच्या अंगावर धावून आल्याने वाद चिघळला. पोलिसांनी तत्परता दाखवत दोन्ही गटांना पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.
हेही वाचा -औरंगाबादमध्ये एमआयएम आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
या प्रकरणी एमआयएमकडून पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, कटकट गेट भागाला छावणीचे स्वरूप आले आहे. याठिकाणी परिस्थिती शांतता पूर्ण आहे असून नियंत्रणात आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या गटावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा आम्ही गुंडगिरी खपवून घेणार नाही, असा इशारा खासदार जलील यांनी दिला आहे.