औरंगाबाद : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला (Marathwada and western Maharashtra) जोडणाऱ्या वैजापूर तालुक्यातील नागमठाण येथील गोदावरी नदीवरील पुलाचे काम 20 वर्षा पासून रखडलेलं आहे. हे काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी, नागमठाणसह पंचक्रोशीतील गावकरी जलसमाधी घेण्यासाठी गोदावरी नदीच्या पुलावर चढून बसल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आंदोलनाबाबत गावकऱ्यांनी यापूर्वीच निवेदन दिले होते. सायंकाळी 5 वाजेपासून आंदोलनकर्ते पुलावर चढले आहेत.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या पुलासाठी नागरिक आक्रमक ; आंदोलकांचा पुलावर चढून जलसमाधीचा पवित्रा
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाचे (Movement bridge work on Godavari river) काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थ आंदोलन करत आहे. हे आंदोलनकर्ते जलसमाधी घेण्यासाठी गोदावरी नदीच्या पुलावर चढून बसल्याने खळबळ उडाली आहे.
पुलासाठी नागरिक आक्रमक
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा वैजापूर तालुक्यातील नागमठाण येथील गोदावरी नदीवरील पुलाचे (Nagmathan bridge over Godavari river) काम अनेक वर्षापासून रखडलेले आहे. या पुलाचा सर्व्हे 1980 झाला. मात्र, प्रत्यक्षात कामाला 2009 साली सुरवात झाली. त्यानंतर पुन्हा काम बंद पडले होते. पण 2019 ला पुन्हा काम चालू करण्यात आले. पंरतु सध्याच्या स्थितीत पुन्हा काम बंद झाल्याने गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले आहे.
Last Updated : Feb 10, 2022, 4:32 PM IST