पैठण (औरंगाबाद) - पैठण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी येथील पंप हाऊस वरण गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीज खंडित होत असल्याने शहराच्या पाणी पुरवठ्यावर विपरीत परिणाम होत आहे. पैठण नगरपरिषद नागरिकांना दररोज पाणी देण्यास सक्षम आहे. मात्र वीज मंडळाच्या अनागोंदी कारभाराचा फटका नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाला बसत असून रमजानच्या काळात जायकवाडी येथील पंप हाऊसचा वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे.
औरंगाबाद : पैठणमध्ये वीज विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे शहराच्याच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम - वीज विभागाचा गलथन कारभार
वीज मंडळाच्या चुकीची किंमत नगरपरिषदेला मोजावी लागत असल्याने वीज मंडळाविरोधात नगराध्यक्ष सुरज लोळगे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाणे गाठत वीज मंडळाच्या अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
लॉकडाऊन काळात भर उन्हाळ्यात तसेच रमजान महिन्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे दृश्य पैठण शहरात पहायला मिळत आहे. नागरिकांना पाणी वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांच्या मनात नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाविरुद्ध असंतोष माजला आहे. वीज मंडळाच्या चुकीची किंमत नगरपरिषदेला मोजावी लागत असल्याने वीज मंडळाविरोधात नगराध्यक्ष सूरज लोळगे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाणे गाठत वीज मंडळाच्या अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून निर्णय घेण्याची भूमिका घेतली, त्यामुळे अखेर गुन्हा न दाखल करताच सर्वांना माघारी परतावे लागले आहे.
हेही वाचा -अंगणवाडी सेविकेला सलाम..! दोन पायांनी अपंग असूनही घरोघरी करते कोरोनासबंधी सर्वेक्षण