औरंगाबाद : कर्जाचे हप्ते भरले नाही, तर वसुली करण्यासाठी खाजगी गुंड कोणत्या थराला जाऊ शकतात. याचे अनेक उदाहरणे आपण पहिले आहेत. मात्र शहरात चक्क कुठलेही कर्ज नसलेल्यासिटी बस जप्तीच्या कारवाईसाठी प्रवाश्यांना खाली उतरवून अरेरावी केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव रस्त्यावर (city bus with no debt stopped on road for recovery) घडला. आपली चूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित एजंसीने माफी मागत प्रकरण मिटवले. याप्रकरणी मनपाने तक्रार न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात (City Bus Aurangabad) आहे.
वसुलीसाठी थांबवली बस :जळगाव रस्त्यावर हर्सूल टी पॉइंटजवळ सोमवारी अचानक स्मार्ट सिटी बस पाच लोकांनी बस थांबवली. प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शिवीगाळ करून खाली उतरवले. कोणालाही काहीच कळत नव्हते. वाहक आणि चालकाने विचारणा केली असता, बसचे बँकेचे लोन आहे. हप्ते भरले नसल्याने ती जप्त करायची आहे असे सांगण्यात आले. त्यावर ही गाडी सरकारची आहे, असे त्यांना सांगितले. मात्र या गाडीचा नंबर आपल्याकडे आहे, आणि हीच ती गाडी जी आम्हाला उचलायची आहे. असे वसुलीला आलेल्या लोकांनी सांगितले. त्यामुळे उपस्थितांमध्ये चर्चा रंगल्या. वाहाकाने तातडीने स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती (city bus stopped on road for recovery) दिली.