औरंगाबाद - सीएए च्या समर्थनार्थ औरंगाबादमध्ये मोर्चा काढण्यात आला. क्रांतिचौक ते औरंगपुरा असा मोर्चा काढण्यात आला. हातात तिरंगा झेंडा घेऊन भारत माता की जय अश्या घोषणा देत नागरिकांनी नवीन नागरिकत्व कायद्याचे स्वागत केले. औरंगाबादेत काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व एकेकाळी पाकिस्तान मध्ये राहिलेल्या विक्रम तलरेजा, दयाल तलरेजा, निरंजन कटारिया, अमरीतलाल नाथानी, बलचंद पारसवानी, श्रीचंद तलरेजा या हिंदू बांधवाना देण्यात आले. या बांधवांनी पाकिस्तान मध्ये हिंदूंना मिळणाऱ्या वागणुकीबाबत आपले अनुभव उपस्थितांना सांगून संसदेत मंजूर झालेला सीएए कायदा योग्य आणि देशहिताच असल्याचे मत वाक्य केले.
सीएएच्या समर्थनार्थ नागरिकांचा औरंगाबादेत मोर्चा - CAA support march in Aurangabad
औरंगाबाद मध्ये सीएएच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. यावेळी हातात तिरंगा झेडा घेऊन भारत माता की जय अशा घोषणा देत नागरिकांनी नवीन नागरिकत्व कायद्याचे स्वागत केले.
देशाचे संरक्षण मंत्री अमित शहा यांनी देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्याची घोषणा केली. त्यानंतर देशात वेगवेगळे मतप्रवाह दिसून आले. देशात अनेक राज्यात कायद्याविरोधात हिंसक आंदोलन करण्यात आले. औरंगाबादेत कायद्याच्या विरोधात एमआयएमने मोर्चा काढला, त्या मोर्चात हजारो मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला. त्यानंतर बुधवारी शहरात कायद्याच्या स्मरणार्थ नागरिकांनी मोर्चा काढला. या मोर्चामध्ये डॉक्टर, इंजिनियर, सीए, यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या पाकिस्तान येथे राहून आलेल्या नागरिकांनी सभेत आपले अनुभव सांगितले. पाकिस्तानमध्ये हिंदू नागरिकांना त्रास दिला जातो, पाकिस्तानमध्ये राहण्यासाठी मुसलमान व्हा अस सांगण्यात येत होते. नाही तर भारतात जा अस सांगण्यात येत असल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. केलेला कायदा योग्य असून सर्वांचा त्यात फायदा असल्याचे मत एकेकाळी पाकिस्तानमध्ये राहिलेल्या नागरिकांनी व्यक्त केले. मोर्चाच्या आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.