महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनच्या अफवेने जाधववडी भाजी मंडईत खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी - लॉकडाऊनच्या अफवा

शहरात लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवा पसरल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे नागरिकांनी किराणा, भाजीपाला खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. रविवारी सकाळी जाधववाडी भाजी मंडईत तोबा गर्दी झाली होती.

rumors of lockdown in aurangabad
rumors of lockdown in aurangabad

By

Published : Mar 7, 2021, 7:11 PM IST

Updated : Mar 7, 2021, 7:19 PM IST

औरंगाबाद - शहरात लॉकडाऊनच्या चर्चेंना उधाण आले आहे. यामुळे नागरिकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली. पूर्वीच्या लॉकडाऊन दरम्यान आलेल्या अडचणी लक्षात घेता किराणा ते दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यास लोकांनी प्राधान्य दिले. मात्र या खरेदी दरम्यान सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडाला आहे. आज सकाळी जाधववाडी येथे भाजीपाला खरेदीसाठी लोकांची तुफान गर्दी जमली होती.

लॉकडाऊनच्या अफवेने जाधववडी भाजी मंडईत गर्दी
अत्यंत गर्दीच्या असलेल्या गुलमंडी, पैठणगेट, औरंगपुरा, शाहगंज, रोशनगेट, जवाहर कॉलनी, गारखेडा, सातारा, शिवाजीनगर, रेल्वे स्टेशन छावणी, बसस्थानक तसेच सिडको, हडको, चिकलठाणा, मुकुंदवाडी येथे देखील रविवार सकाळपासून गर्दी दिसत होती. गर्दी अचानक वाढल्याने दुकानदारही गडबडून गेले होते. आता अचानक गर्दी वाढल्याने ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करता आल्या व्यावसायिकांनी सांगितले.हे ही वाचा - राजापूर रिफायनरी'प्रकल्प हातातून गमावणे महाराष्ट्राला परवडणार नाही - राज ठाकरे

दारू दुकानांसमोरही गर्दी -


लॉकडाऊन लागणार यामुळे अनेकांची भाजीपाला खरेदीसाठी धडपड सुरू होती. तर दुसरीकडे मद्यपींना दारूची चिंता होती. मागच्या लॉकडाऊन दरम्यान महाग मद्य विकत घ्यावं लागल्याने अनेकांच्या खिशाला कात्री लावली होती. यामुळे अनेक मद्यप्रेमींनी मद्याच्या दुकानावर गर्दी केली होती. यातील अनेकांनी तर आठवडाभर पुरेल एवढा मद्यसाठा करून ठेवला आहे.

हे ही वाचा - इसिसमध्ये दाखल झालेला 'तो' तरुण कल्याणला परतला

Last Updated : Mar 7, 2021, 7:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details