औरंगाबाद- यावर्षीचा संक्रांतीचा सण कोरोनाच्य सावटाखाली साजरा झाला. यावेळी औरंगाबदकरांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेत पतंग उडवण्याचा आनंद घेतला. गुलमंडी येथे महिलांचाही मोठ्या सहभाग बघायला मिळाला. तर राजाबाजार येथे पतंग प्रेमींनी गाण्याच्या तालावर ढील सोडत एक दुसऱ्याचे पतंग काटले.
कुठे साऊंड सिस्टीम तर काही ठिकाणी तशा...
गुरुवारी सकाळीच लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनीच पतंग उडवल्या सुरुवात केली होती. यासाठी अनेकांनी दोन तीन दिवस अगोदरच तयारी करून ठेवली होती. अनेकांनी छतावर साऊंड सिस्टीम लावली होती. तर काही ठिकाणी ताशा वाजवत जल्लोष करण्यात आला. यावेळी गुलमंडी, रजाबजार, सिडको, बेगमपुरा, उस्मानपुरा, पुंडलिक नगर, शिवाजी नगर, टी.वी सेंट यासह शहरातील विविध भागात पतंग महोत्सव बघायला मिळाला.
औरंगाबादकरांनी लुटला पतंग उडवण्याचा आनंद महिलांनी दिली ढील.... कोरोनाच्य पार्श्वभूमीवर औरंगाबादकरांनी गेल्या नऊ दहा महिन्यांपासून घरात राहून सण साजरे केले. यामुळे घरात राहून कंटाळलेल्या औरंगाबादकरानी यावर्षीचा पहिला संक्रांतीचा सण आपआपल्या छतावर जाऊन पतंग उडवत साजरा केला. यावेळी महिलावर्ग देखील मोठ्या उत्साहात या पतंग उत्सवात सहभागी झाल्या होत्या. दरम्यान यावेळी काही महिलांनी स्वतः पतंग उडवले. तर काहींनी आपल्या पतीच्या पतंगाची चक्री धरत ढील दिली.
राजकारण्यांनी पतंग टाळला...
गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील पुढारी पतंग उडवण्यासाठी एकत्र येण्याची परंपरा आहे. यामुळे सकाळपासूनच राजकीय मंडळी 'चल खिच' म्हणत एक दुसऱ्याची पतंग काटत असत. यंदा मात्र चित्र काहीस वेगळच होत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय मंडळींनी सार्वजनिक ठिकाणी येऊन पतंग उडवायचे टाळले.