औरंगाबाद : उर्फी जावेदला काय माहिती काय भीती वाटते. संविधानाने दिलेले अधिकार आहे मला माहिती आहे. मात्र त्यासाठी तिने काहीतरी घालायला पाहिजे. उघड नागड रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी नागडे चाळे करणार हे चालणार नाही. तुझ्या स्टुडिओत, घरात काय करते ते कर, पण बाहेर काही करू नकोस. कोणता धर्म सांगतो की बाई रस्त्यावर नागडी नाच. लोकांसाठी हे राजकारण मात्र माझ्यासाठी हा संस्कृतीचा प्रश्न. मी वकील नाही, पण मला माहित आहे काय कायद्याची तरतूद आहे ते, माझा मॅसेज खूप स्ट्रॉंग आहे. सरकार सरकारचे काम करेल, पोलीस पोलिसाचे काम करेल, आम्ही आमचं काम करू. नंगा नाच मुंबईत रोखला नाही; तर औरंगाबादच्या चौकात हे नाच होतील, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.
Chitra Wagh Uorfi Javed Dispute : ऊर्फी जावेदसाठी माझ्याकडे येऊ नका, मला विचारता म्हणून मी बोलते - चित्रा वाघ - मला विचारता म्हणून मी बोलते
उर्फि जावेद साठी माझ्याकडे येत असाल तर येऊ नका, अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. माझ्या मुलांचे फोटो सोशल मीडियावरून फिरवण्यात आले, काय सिद्ध केलं. आमची फक्त इतकी मागणी होती की, तिला जे काही करायचं ते सार्वजनिक ठिकाणी करू नये. एकट्यात बंद घरात काय करायचं ते तिने करावं. तिचा नंगा नाच आम्ही सहन करणार नाही, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी टीका केली.

तिच्यासाठी माझ्याकडे येऊ नका :तिचे फॉलोअर्स वाढत असतील, तर हा नंगा नाच सहन करायचा का? आमचे मुले मुली भाषण करत नाही का? सोशल मीडियावर माझ्यावर टीका केली जात आहे. माझ्या मुलांबाबत बोललं जात आहे. माझी मुलं राजकारणात आहेत का? त्यांच्या बाबतीत बोलून काय सिद्ध केलंय? जो पर्यंत ती कपडे घालत नाही तोपर्यंत हे चालणार. उर्फी सारख्या नंगाट लोकांना पक्षात जागा नाही. माझ्यावर टीका करा, हरकत नाही, पण माझ्या पक्षाबद्दल आणि कुटुंबाबद्दल कोणीही बोलू नये. मी उर्फी उर्फी बोलत नाही, मला प्रश्न विचारले जातात. जर तिच्यासाठी माझ्याकडे येत असाल तर येऊ नका, अशी संतप्त प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.
पोलीस अधिकाऱ्यावर होईल कारवाई :औरंगाबाद येथील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या विरोधात महिलेने तक्रार दिली. मोदींची जनभावना आहे की, चुकीचं वागणाऱ्या हारामखोरांना शिक्षा द्यायला पाहिजे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये महिलांकडे वाईट नजरेने पाहणाऱ्याची गय केली जाणार नाही. गुप्तांगातून स्व्याब घेण्याचा किळसवाणा प्रकार मागील सरकारमध्ये झाला. शिंदे फडणवीस सरकारमध्ये चुकीच्या वागणाऱ्या 4 ते 5 पोलिसांना सस्पेंड केले आहे. आज संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत सर्व प्रोसेस समोर येईल. अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली. तर राज्यभर दौरा करत असून; औरंगाबाद शेवटचा जिल्हा आहे. आमच्याकडे एकापेक्षा एक सक्षम महिला आमदार आहेत. सर्वाधिक महिला आमदार असलेला पक्ष आमचा आहे, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं.