औरंगाबाद : राज्यभर गाजलेल्या जालना जिल्ह्यातील जांब समर्थ गावातील राम मंदिरातील मूर्ती चोरी प्रकरण ताजे असताना, औरंगाबादच्या कचनेर येथील श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरातून सोन्याची दोन किलो वजनाची चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती चोरीला गेली असल्याचे उघड ( Two Kg Gold God Idol stolen ) झाले. इतकेच नाही तर त्या जागी हुबेहूब मूर्ती चोरट्यांनी बदलली असल्याच्या घटनेने खळबळ उडाली ( Chintamani Parswanath Bhagwan idol stolen ) आहे.
मंदिरात चोरी झाल्याचे आले समोर :पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कचनेर येथे असलेल्या श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात महिना भरापूर्वीच मंदिर प्रशासनाने दोन किलो वजनाची सोन्याची चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती बसविली ( Lord Chintamani Parswanath Duplicate Idol kept instead ) होती. मात्र अज्ञात व्यक्तींनी गाभाऱ्यातून ही दोन किलो वजनाची सोन्याची मूर्ती चोरली आहे.
पंचधातूची हुबेहूब मूर्ती :त्याजागी पंचधातूची हुबेहूब दिसणारी मूर्ती ठेवली त्यामुळे मूर्तीची अदलाबदली केव्हा झाली हे लक्षात आले नाही. मात्र शनिवारी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मूर्तीच्या पायाजवळचा भाग पांढरा पडत चालल्याचे लक्षात आल्यानंतर मूर्तीचे वजन आणि परीक्षण करण्यात आले. तेव्हा मूर्ती 1 किलो 66 ग्राम भरली, विशेष म्हणजे मूळ सोन्याची मूर्ती दोन किलो 300 ग्राम वजनाची आहे. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
चोरी कधी झाली माहीत नाही :महिनाभरापूर्वीच मंदिर प्रशासनाने दोन किलो वजनाची सोन्याची चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती स्थापित करण्यात आली होती. मात्र नियमित मंदिरात येणाऱ्या भाविकांना मूर्तीचा रंग फिकट पडल्याचे दिसून आल्याने त्यांचा संशय निर्माण झाला. त्यातून त्यांनी मूर्ती बदलली गेल्याचा संशय व्यक्त केला. त्यानंतर मूर्तीच वजन तपासले असता सर्व प्रकार उघडकीस आला. मात्र हा प्रकार मागील महिना भरात कधी घडला हे कळले नाही. मंदिरात सीसीटिव्ही आहेत. मात्र त्यांचे चित्रण स्पष्ट नाही. तरी त्या आधारे मूर्ती चोराचा शोध घेत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलीसांची घटनास्थळी पाहणी :कचनेर येथे असलेल्या श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात रोज हजारो शहरासह राज्याच्या विविध भागांतून दर्शनासाठी येत असतात. जैन समाजातील पवित्र असे प्रसिद्ध मंदिरात कचनेरच्या मंदिराचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच स्वतः पोलीस अधीक्षक मनीष कालवानिया यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. काही संशयितांची तपासणी सुरू केल्याचं पोलिसांनी सांगितले.