महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार संतपीठाची घोषणा - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर येणार आहेत. पैठण येथील संतपीठ सुरू करण्याची घोषणा ते करणार आहेत, अशी माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

v
v

By

Published : Sep 9, 2021, 7:07 PM IST

औरंगाबाद - येत्या 17 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर येणार आहेत. पैठण येथील संतपीठ सुरू करण्याची घोषणा ते करणार आहेत, अशी माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. लवकरच अभ्यासक्रमही सुरू होणार असून त्याबाबत मनुष्यबळ पुरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही सामंत यांनी सांगितले.

बोलताना मंत्री सामंत

संतपीठात होणार संशोधन

संतपीठात या महिन्याच्या 22 तारखेपर्यंत सुरू होईल. सुरुवातीला पाच प्रकारचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. ज्याचा 6 महिने आणि एक वर्षपासून पुढे त्याचा कालावधी असणार आहे.

असा असेल अभ्यासक्रम

अभ्यासक्रम कालावधी
तुकाराम गाथा परिचय प्रमाणपत्र 6 महिने
ज्ञानेश्वरी परिचय प्रमाणपत्र 6 महिने
एकनाथी भागवत परिचय प्रमाणपत्र 6 महिने
वारकरी कीर्तन परिचय पत्र एक वर्ष

याशिवाय वारकरी पूर्ण कीर्तन, ज्यामध्ये वादकांसह इतर सर्व बारकावे शिकायला मिळतील. संत परंपरा वारकरी परंपरा या विषयात आता संशोधन होणार आहे. अनेक वर्षे रेंगाळलले असलेले हे विद्यापीठ सुरू होईल, असे उदय सामंत म्हणाले.

राज्यातील कॉलेज अद्याप सुरू नाही

राज्यातील कॉलेज सुरू करण्याबाबत अजून निर्णय नाही, असे मंत्री सामंत म्हणाले. मात्र, तिसऱ्या लाटेत मुलांना धोका अधिक असल्याचे सगळे सांगतात. तरी शाळा सुरू होत आहेत. मग कॉलेज का होत नाही, शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या चुकला का असे विचारल्यावर तो त्या खात्याचा निर्णय आहे. याबाबत मी बोलणार नाही, असे उत्तर मंत्री सामंत यांनी दिले. मात्र, आम्ही सगळी काळजी घेऊन खातरजमा करूनच कॉलेज सुरू करू, असेही उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा -शिवना नदीच्या महापुरात शेतकऱ्याची विहीर गेली वाहून, बंधाऱ्यांनाही फटका

ABOUT THE AUTHOR

...view details