महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संभाजीनगरात हँडग्लोज तयार करणाऱ्या कंपनीत मध्यरात्री 'अग्नितांडव'; सहा कामगारांचा 'कोळसा' - वाळूज औद्योगिक महानगर

Chhatrapati Sambhajinagar Fire : संभाजीनगरातील वाळूज औद्योगिक परिसरातील एका हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीत मध्यरात्री आग लागल्याची घटना समोर आलीय. या आगीत सहा जणांचा मृत्यू झालाय. तर चार जणांना आपला जीव वाचवण्यात यश आलंय.

Chhatrapati Sambhajinagar Fire
Chhatrapati Sambhajinagar Fire

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 31, 2023, 6:55 AM IST

Updated : Dec 31, 2023, 10:14 AM IST

आगीत सहा जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर Chhatrapati Sambhajinagar Fire : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक परिसरातील हँडग्लोज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राईज कंपनीला मध्यरात्री आग लागून 6 कामगारांचा मृत्यू झालाय. तर 4 कामगारांनी स्वतःचा जीव वाचवलाय. ही घटना मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली असून आग विझवण्यात तब्बल चार तासांचा कालावधी लागला. नेमकी आग कशामुळं लागली, याची अद्याप खात्रीशीर माहिती समोर आली नाही. सर्व मृतांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात आणण्यात आले असून, पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सुरु केलाय.

हँडग्लोज तयार करणाऱ्या कंपनीत 'अग्नितांडव'

हँडग्लोज तयार करणाऱ्या कंपनीत अचानक आग : वाळूज औद्योगिक परिसरातील सी 216 येथील सनशाईन एंटरप्राईज या हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीमध्ये एकूण 20 ते 25 कामगार काम करतात. एकावेळी 10 कामगार कंपनीत काम करतात. रात्रीपाळी असताना सगळे कर्मचारी झोपेत असताना अचानक कंपनीला आग लागली. काही झोपलेल्या कामगारांना गरम वाटू लागल्यानं जाग आली. त्यावेळी त्यांनी पाहिले असता, आग लागल्याचं निदर्शनास आलं. बाहेर पडण्याच्या जागेवरच आग लागल्यानं कामगारांना बाहेर येणं शक्य नव्हतं. परंतु, काही कामगार पत्रे उचकटून एका झाडाच्या मदतीनं बाहेर पडले. मात्र सहा जणांना बाहेर पडणं शक्य झालं नाही, त्यामुळं त्यांचा गुदमरुन मृत्यू झालाय.

सहा जणांचा मृत्यू : प्रत्यक्षदर्शी कामगारानं दिलेल्या माहितीनुसार अकबर बिहारच्या मिर्झापूर इथले हे कामगार असून यातील दोन कामगारांना आपला जीव वाचवता आला. परंतु कंपनीत अडकलेले 6 जण भल्ला शेख, कौसर शेख, इक्बाल शेख, मगरुफ शेख आणि अजून दोन जण या सर्वांचा गुदमरुन मृत्यू झालाय. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांचासह वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि आग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. या आगीवर तब्बल 4 तासांच्या प्रयत्नानंतर नियंत्रण मिळवता आले.

हेही वाचा :

  1. नाशिकच्या सिन्नर एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; बॉयलर फुटल्यानं झाला स्फोट, पाहा व्हिडिओ
  2. बोरीवली पश्चिम द्रुतगती महामार्गावर जाणाऱ्या मिक्सर ट्रकला भीषण आग; पाहा व्हिडिओ
  3. नवी मुंबईतील तळोजा औद्योगिक परिसरात केमिकल्स फॅक्टरीला भीषण आग
Last Updated : Dec 31, 2023, 10:14 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details