महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Devendra Fadnavis : टीव्हीवर बोलणाऱ्यांचे मानसिक आरोग्य तपासून उपचार करा; फडणवीसांचा राऊतांना नाव न घेता टोला - Devendra Fadnavis criticizes opponents

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी औरंगाबाद येथील आरोग्य शिबिरात विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. महाआरोग्य शिबिरात (Maha Arogya Camp Aurangabad) सर्वसामान्य रुग्णांची तपासणी करता तशी टीव्हीवर बोलणाऱ्यांची तपासणी करा. त्यामुळे राज्यातील वैचारीक प्रदूषण कमी होईल, असा हल्लाबोल फडणवीसांनी केला संजय राऊत यांच्यावर नाव न घेता केला आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

By

Published : Aug 13, 2023, 7:19 PM IST

Updated : Aug 13, 2023, 7:43 PM IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण

औरंगाबाद : ज्याप्रमाणे तुम्ही आरोग्य शिबिरांमध्ये सामान्य रुग्ण तपासतात, त्याप्रमाणे टीव्हीवर सतत बोलणाऱ्या काही लोकांना मानसोपचार तज्ज्ञांकडे रेफर केले तर महाराष्ट्र बरा होईल, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच अशा लोकांना मानसोपचार तज्ज्ञांकडे नेल्याने राज्यातील वैचारीक प्रदूषण कमी होईल, असा हल्लाबोल देखील फडणवीस यांनी विरोधकांवर केला आहे. ते आज औरंगाबद शहरात आयोजित आरोग्य शिबिरात बोलत होते.

टीव्हीवर बोलणाऱ्यांची तपासणी करा :आरोग्य शिबिरात सर्वसामान्य रुग्णांची तपासणी करता तशी टीव्हीवर बोलणाऱ्यांची तपासणी करा. त्यांना मानसोपचार तज्ञाची गरज आहे की, पागालखण्यात ठेवाचे याचे निदान होईल. त्यानंतरच गिरीश भाऊ तुम्ही आरोग्यदूत म्हणून यशस्वी व्हाल, अशी मिश्किल टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरात सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिरात केली आहे.

मी इतका मोठा नाही :शहरातील राजेंद्र साबळे गेल्या काही वर्षांपासून देवेंद्र महोत्सव (Devendra Mahotsav) आयोजित करतात. मला प्रत्येकवेळी निमंत्रण देतात. मात्र, मी येत नाही, कारण मला हे मान्य नाही. माझ्या नावाने महोत्सव घ्यावा, इतका मोठा मी नाही. मात्र आरोग्य शिबिर असल्याने मी आली. खरतर मी माझा वाढदिवस कधी साजरा केला नाही, होर्डिंग लावले नाही, ते मला पटत नाही. इतकी पद मिळाली, मात्र मी कधी स्वागत स्वीकारले नाही, काही नियम मी बनवले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

साडेतीन लाख नागरिकांची तपासणी :सर्वसामान्यांना असाध्य आजारांवर मोफत तपासणी, उपचार मिळावेत यासाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. या शिबिरात साडेतीन लाख नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली, ही विशेष बाब आहे. या शिबिरासाठी विविध समाजसेवी व्यक्ती, संस्था आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी मोलाचे योगदान दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. अयोध्यानगरी मैदानावर महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, केंद्रीय अर्थमंत्री डॉ.भागवत कराड, मा. हरिभाऊ राठोड, आमदार संजय शिरसाठ, आमदार प्रशांत बंब, नारायण कुचे आदींची उपस्थिी होती.

वेलनेस सेंटर'च्या माध्यमातून गरीबांवर उपचार : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आजारांवरील औषधांच्या किमती कमी करून सर्वसामान्यांसाठी उपचार स्वस्त केले आहेत. सर्व देशवासीयांना मोफत कोविड लस देण्यात आली. देशातील अडीच लाख 'वेलनेस सेंटर'च्या माध्यमातून गरीबांवर उपचार केले जाणार आहेत. पंतप्रधान आरोग्य कल्याण निधीतून (Prime Minister Health Welfare Fund ) वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळते. व्योश्री योजनेंतर्गत वृद्धांना उपचार, सहाय्यक साहित्य मोफत दिले जाणार आहे. राज्य सरकार महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचारही देणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांना उपचार मिळणार आहेत. आता ही योजना राज्यातील 12 कोटी लोकांना लागू होणार आहे. आरोग्य सेवेचा अधिक विस्तार करण्यासाठी शासनाने राज्यात 14 वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी 11 सुरू करण्यात आली आहेत. उर्वरित तीनही वैद्यकीय महाविद्यालये लवकरच सुरू होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य शिबिर कार्यक्रमात दिली.

हेही वाचा -

  1. Ajit Pawar Sharad Pawar Meeting : अजित पवारांनी शरद पवारांना काय दिला प्रस्ताव? आणखी भेट होण्याची शक्यता
  2. Rahul Gandhi : 'ते' या देशाचे मूळ मालक आहेत - राहुल गांधी
  3. Sanjay Shirsat on CM Health: मुख्यमंत्र्यांना १६ ऑगस्टला जबरदस्ती रुग्णालयात पाठवू - संजय शिरसाट
Last Updated : Aug 13, 2023, 7:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details