औरंगाबाद- सनदी अधिकारी आणि न्यायाधीशांना राजकारणात येण्यासाठी सेवानिवृत्तीनंतर किमान तीन ते पाच वर्ष राजकारणात येता येणार नाही, असा कायदा करा अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत केली.
मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीनमागील काही वर्षांमध्ये विविध प्रकरणांत सनदी अधिकाऱ्यांचे नाव हे राजकीय पक्षांची जोडले जात आहे. न्यायव्यवस्थेच्या योग्य प्रकारे चालावी, यासाठी अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर तीन ते पाच वर्षानंतर निवडणूक लढवण्याचा अधिकार असावा. मुंबई पोलीस जगभरात त्यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रसिद्ध आहे परंतू काही दिवसांपासून मुंबई पोलीस अधिकाऱ्यांचे विविध पक्षांसोबत नाव जोडले जात आहे त्यामुळे मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलीन होत आहे. काही मोजक्या अधिकाऱ्यांमुळे सर्व पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असल्याचे मत जलील यांनी व्यक्त केले.
हेही वाचा-LIVE Updates : प. बंगाल, आसाममध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
पाच वर्षांपर्यंत राजकीय प्रवेश नकोच
पोलिसांमध्ये अनेक निष्ठावान अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. मागील काही घटनांमध्ये काही अधिकारी राजकीय पक्षांसोबत हितसंबंध जोपासत सेवा निवृत्त होताच लोकसभा, राज्यसभेत किंवा विधानसभेत येतात. त्यामुळे सेवेत असताना राजकीय पक्ष त्यांचा वापर करतात त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळेच प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्था योग्य रीतीने चालावी याकरीता सनदी अधिकारी आणि सेवा निवृत्त न्यायाधीश यांना निवृत्तीनंतर पुढील तीन ते पाच वर्षे राजकीय प्रवेश किंवा निवडणूक लढवता येणार नाही असा कायदा करायला हवा, अशी मागणी जलील यांनी लोकसभेत केली.
हेही वाचा..सचिन तेंडुलकर कोरोनाग्रस्त, कुटुंबियांची कोरोना चाचणी निगेटिव्ह