औरंगाबाद- लोकांना माझीच आठवण येणार, मी खासदार नसलो तरी खासदारासारखच काम करतो. मला संधी मिळाली नाही तरी मी नाराज नाही. मला इम्तियाज जलील यांच्या विरोधात काम करण्यासाठी, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदारकी हवी होती, अशी भावना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली.
आदित्य ठाकरे आमच्या पक्षाचे नेते आहेत. त्यापुढे जाऊन ते उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. त्यामुळे त्यांचा आम्हाला आदर आहे आणि आम्ही तो करतो. मी पक्ष सोडेल असं सर्वांना वाटत, मात्र मी 32 वर्ष पक्षात आहे. मी मातोश्रीचा पाईक आहे, शिवसेना पहिल्या सारखीच आहे. आता मी स्मशानात जाईल तोही भगव्यातच जाईल, असे भावनिक वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केले.
राज्यसभेची संधी न मिळाल्याने मी माध्यमांना बोलल्याचे पक्षातील वरिष्ठांना चुकीचे वाटले तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मी कडवट शिवसैनिक आहे, पक्षाचे काम करत राहील. पक्षाकडून नक्कीच विचार होईल, असे स्पष्टीकरण शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिले. गेली तीन दिवस माझा फोन बंद होता. मला काही अभ्यास करायचा होता म्हणून मी एकटाच होतो. निवडणुकीच्या तोंडावर नियोजन करण्यासाठी मी अभ्यास करत असल्याचे खैरे यांनी सांगितले. राज्यसभा औरंगाबादला मिळेल, अशी आशा होती. पण, प्रियांका चतुर्वेदी यांना मिळाली. मला लोकांची काम करण्यासाठी संधी हवी होती. मात्र, हरकत नाही मला काहीतरी चांगले मिळेल.
लोकसभेत नशीब कमी पडल्याची खंत खैरे यांनी व्यक्त केली. कोरोनामुळे गुढीपाडव्याच्या शोभा यात्रा रद्द केल्या असून महापालिका निवडणुक तोंडावर आली असल्याने, निवडणूक 3 महिने पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानुसार सरकारने शिफारस केल्याचे मत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.
हेही वाचा -...अन् पोलीस उपायुक्तांच्या दालनातच घेतले महिलेने विष