महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्याला' अक्कल नाही, तो सायको; चंद्रकांत खैरे संतप्त - हर्षवर्धन जाधव

कन्नड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचे वक्तव्य संतापजनक आहे. त्याला अक्कल नाही; तो सायको असल्याने त्याचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

By

Published : Oct 16, 2019, 9:39 PM IST

Updated : Oct 16, 2019, 10:50 PM IST

औरंगाबाद - कन्नड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचे वक्तव्य संतापजनक आहे. त्याला अक्कल नाही; तो सायको असल्याने त्याची उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. कन्नड येथील प्रचारसभेत हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. यानंतर सर्व स्तरांमधून शिवसैनिकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

आमच्यावर टीका केली असती तर आम्ही सहन केली असती. मात्र साहेबांवर केलेली टीका सहन होणारी नसल्याने या कृत्याचा जाब जनता विचारेल, असे देखील खैरे म्हणाले.तसेच हर्षवर्धन जाधव 'सायको' माणूस असून, त्याला पाच वर्षे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांभाळल्याचे खैरे यांनी सांगितले. पक्षप्रमुखांबद्दल वापरलेल्या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे, असे खैरे म्हणाले.

हर्षवर्धनने आपल्या वडिलांवर हात उचलला होता. त्याच्या बायकोला देखील तो मारत असल्याची माहिती चंद्रकांत खैरे यांनी दिली. हर्षवर्धन जाधवची बायको म्हणजे रावसाहेब दानवे यांची मुलगी; तिलाही मारून हाकलून दिले होते; दोन दिवसांपूर्वी ती परत घरी आली, असा आरोप त्यांनी केला.

अशा माणसाची उमेदवारी रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली असून सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे खैरे यांनी सांगितले.

Last Updated : Oct 16, 2019, 10:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details